IPL 2025 Mega Auction : वय वर्ष 13, आतापर्यंत 49 शतकं, मेगा ऑक्शनमध्ये उतरलेला वैभव सूर्यवंशी कोण?

| Updated on: Nov 16, 2024 | 9:54 AM

IPL 2025 Mega Auction : आयपीएल गवर्निंग काउंसिलने 574 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. हे खेळाडू ऑक्शनमध्ये दिसतील. म्हणजे 1000 खेळाडू आधीच ऑक्शनमधून बाहेर गेले आहेत. ऑक्शनसाठी निवडलेल्या 574 खेळाडूंमध्ये एक 13 वर्षांचा खेळाडू सुद्धा आहे.

IPL 2025 Mega Auction : वय वर्ष 13, आतापर्यंत 49 शतकं, मेगा ऑक्शनमध्ये उतरलेला वैभव सूर्यवंशी कोण?
vaibhav suryavanshi
Image Credit source: instagram
Follow us on

आयपीएल 2025 पासून सुरु होणाऱ्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबरला सौदी अरेबियाच्या जेद्दा येथे मेगा ऑक्शन होणार आहे. यावेळी एकूण 1,574 खेळाडूंनी नोंदणी केलीय. रजिस्टर करणाऱ्या खेळाडूंमध्ये 1,165 भारतीय आणि 409 परदेशी खेळाडू आहेत. आता आयपीएल गवर्निंग काउंसिलने 574 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. हे खेळाडू ऑक्शनमध्ये दिसतील. म्हणजे 1000 खेळाडू आधीच ऑक्शनमधून बाहेर गेले आहेत. ऑक्शनसाठी निवडलेल्या 574 खेळाडूंमध्ये एक 13 वर्षांचा खेळाडू सुद्धा आहे.

आयपीएल गवर्निंग काउंसिल जारी केलेल्या ऑक्शन लिस्टमध्ये 366 भारतीय आणि 208 परदेशी खेळाडू आहेत. यात एक नाव बिहार समस्तीपुरच्या वैभव सूर्यवंशीच आहे. वैभव सूर्यवंशी आता फक्त 13 वर्षांचा आहे. या छोट्या वयातच तो रणजी ट्रॉफी, हेमंत ट्रॉफी, कूच बिहार ट्रॉफी आणि विनू मांकड़ ट्रॉफी सारख्या स्पर्धांमध्ये खेळला आहे. अलीकडेच त्याची भारताच्या अंडर-19 टीममध्ये निवड झाली होती. वैभव सूर्यवंशी प्रतिभावान खेळाडू आहे. एका वर्षात वेगवेगळ्या टूर्नामेंट्समध्ये त्याने एकूण 49 सेंच्युरी झळकवल्या आहेत.

अंडर-19 वनडे स्पर्धेत त्रिशतक

वैभव सूर्यवंशीने वयाच्या 5 व्या वर्षापासून क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. वैभवला त्याचे वडील संजीव नेट प्रॅक्टिस द्यायचे. त्यासाठी वडिलांनी घरीच नेटची सोय केली होती. वैभवला रणजी ट्रॉफीच्या मागच्या सीजनमध्ये बिहारकडून डेब्युची संधी मिळाली होती. वैभवने 12 वर्ष 284 दिवसात आपला पहिला फर्स्ट क्लास सामना खेळला होता. बिहार क्रिकेट संघाकडून रणधीर वर्मा अंडर-19 वनडे स्पर्धेत वैभव सूर्यवंशी त्रिशतक लगावलं होतं. अंडर-19 टुर्नामेंटच्या इतिहासातील हे पहिलं त्रिशतक आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध कडक बॅटिंग

वैभव सूर्यवंशी मागच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या अंडर-19 टीम विरुद्ध कमालीची इनिंग खेळला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने 64 चेंडूत 104 धावा बनवल्या होत्या. त्याने 58 चेंडूत शतक झळकावलं होतं. या स्फोटक इनिंगमध्ये त्याने 14 चौकार आणि 4 षटकार मारले होते. अंडर 19 टेस्टमध्ये वेगवान शतक झळकवणारा पहिला भारतीय फलंदाज बनला होता.