vinesh phogat disqualified : भारताची कुस्तीपटू विनेश फोगाटचं ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकचा अंतिम सामना खेळण्याआधीच विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आलं. याचं नेमकं कारण काय आहे..? पाहुयात
पॅरिस ऑलिम्पिकमधून बुधवारी महिला कुस्तीमध्ये अंतिम सामन्यात पोहोचलेल्या विनेश फोगाटला अयोग्य घोषित करण्यात आलंय. याबातमीनं ऑलिम्पिकमधून सुवर्ण पदकाची आशा बाळगलेल्या करोडो भारतीयांना धक्का बसला. विनेश फोगाटनं अंतिम सामन्यात धडक मारली होती. म्हणजेच भारताचं रौप्य पदक निश्चित होतं. पण विनेश फोगाटला अयोग्य घोषित केल्यानं तीचं ऑलिम्पिक मेडलचं स्वप्न भंग झालं.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट 50 किलो वजन कॅटिगिरीत खेळत होती. मंगळवारी विनेशनं क्युबाच्या कुस्तीपटू विरोधात सेमीफायनल जिंकली. त्यावेळी तीचं वजन 50 किलो होतं. नियमानुसार फायनलच्या अगोदर विनेशचं वजन करण्यात आलं ते 100 ग्रॅम जास्त होतं. याच कारणामुळे विनेश फोगाटला अंतिम सामन्यासाठी अयोग्य घोषित करण्यात आलं.
कुस्तीमध्ये वजन कॅटेगिरीत दोन्ही पहेलवानांचं वजन सारखंच असायला हवं. या खेळात नियम आंतरराष्ट्रीय कुस्ती संघानं ठरवले आहेत. विनेशच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कुस्ती संघाच्या प्रमुखांनी आता काही होऊ शकत नाही असं म्हटलंय. नियमांचा आदर राखायला हवा, नियम हा नियम असतो असंही प्रमुखांनी म्हटलं.
याचा अर्थ सरळ आहे. विनेशचं ऑलिम्पिक मेडलचं स्वप्न अंतिम फेरीत पोहोचूनही पूर्ण होऊ शकलं नाही. या प्रकरणानंतर विनेश फोगोटला डी हायड्रेशन झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अंतिम सामना असल्यानं विनेश फोगाटनं रात्रभर प्रॅक्टिस केली होती. पाणीही पिलं नव्हतं. त्यामुळे तीला डी हायड्रेशन झालं. विनेशचं सामन्याअगोदर पाणी न पीण्याचं कारणही वजनाशी संबंधित आहे.
विनेशचं नेमकं प्रकरण काय?
1) विनेश फोगाट 50 किलो वजन कॅटॅगिरीत खेळत कुस्ती खेळत आली आहे.
2) ऑलिम्पिक अगोदरही वजन नियंत्रणात राहावं यासाठी विनेशनं खूप प्रयत्न केलेत.
3) कमी कॅलरिज असलेलं अन्न, वर्कआऊट, सायकलिंग करत विनेशनं वजनावर नियंत्रणात मिळवण्यात यश मिळवलं.
4) कुस्तीत खेळणाऱ्या खेळाडूंचं आव्हान एक दिवस आधीपासून सुरु होतं.
5) पहेलवान शरीराचं वजन कमी ठेवण्यासाठी खूप वेळ पाणी पीत नाहीत
6) पाणी न पील्यानं शरीरात पाण्याचं वजन राहत नाही
7) पाणी न पीता पहेलवान स्व:ताला डी हायड्रेट करुन घेतात त्यामुळे सामन्याच्या वेळी वजन कमी राहतं
8) विनेशच्या बाबतीत हेच घडल्याचं म्हटलं जातंय.
9) विनेशला डी हायड्रेशन झाल्यानं पॅरिसच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय..
10) विनेशचं वजन फक्त 100 ग्रॅम जास्त भरल्यानं तीच्याबरोबरच करोडो भारतीयाचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भगलं आहे.