भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी याची प्रकृती पुन्हा एकदा खालावल्याची बातमी समोर आली आहे. त्याला ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विनोद कांबळीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कांबळीची प्रकृती सध्या स्थिर आहे.
मुलासाठी जगायचंय….
विनोद कांबळीची ही अवस्था पाहता त्याने त्याच्या मुलाबद्दल एका मुलाखतीत दिलेलं उत्तर आठवतं की, तो म्हणाला होता, ” मी आता सुधारलोय. मी दारु सोडली आहे आणि आता मला मुलांसाठी जगायचं आहे.” असं म्हणत तो मुलासाठी भावूक झाल्याचं पाहायला मिळाला होता.
तर पुढे त्याने आपल्या मुलाचा उल्लेख करताना सांगितले होते की, “आज जो मी या वाईट परिस्थितीमधून बाहेर पडलो आहे, त्याचे पहिले कारण हा माझा मुलगा आहे. कारण तो मला म्हणाला होता, तुम्ही या सर्व परिस्थितीमधून बाहेर पडू शकता.” असं म्हणत त्याने आपल्या मुलाचा समजुदारपणाही सांगितला होता.
विनोदचा लेक नक्की करतो तरी काय?
दरम्यान विनोदचा लेक नक्की करतो तरी काय? हे बऱ्याच जणांना माहित नाही. विनोदच्या मुलाचं नाव जीजस ख्रिस्तियानो कांबळी. तो 14 वर्षांचा आहे. विनोद कांबळीचे अँड्रीया हेविटबरोबर लग्न झालं. विनोदचं हे दुसरं लग्न होतं. 2010 मध्ये या दोघांना पूत्ररत्न प्राप्त झालं.
विनोदने यापूर्वी आपल्या मुलाचा जास्त उल्लेख कुठेच केला नव्हता. पण सध्याच्या वाईट अवस्थेनंतर जेव्हा विनोदची मुलाखत झाली तेव्हा तो आपल्या मुलाबद्दल मनापासून बोलताना दिसतो. शिवाय विनोदचा लेक हा उत्तम क्रिकेटर असल्याचेही म्हटले जाते.
Jesus Christiano is firing on all cyclinders! T20 mode 🔛 pic.twitter.com/F8FSHmPM6d
— Vinod Kambli (@vinodkambli349) March 15, 2019
लेक वडिलांसारखाच शैलीदार फटकेबाजी करणारा
एका मुलाखतीत विनोदने म्हटलं होतं, ” माझा मुलगा माझ्यासारखाच डावखुरा फलंदाज आहे. माझ्यासारखीच म तो करतो. कोणत्याही गोलंदाजाला न घाबरता तो फलंदाजी करतो, हे मी पाहिले आहे. त्यामुळे माझ्या फलंदाजीतला काही अंश त्याच्यामध्ये आहे, असे मला वाटते. तो एक चांगला क्रिकेटपटू व्हावा, हेच माझे स्वप्न आहे आणि तो यासाठी अथक मेहनत घेत आहे. त्यामुळे बघुया की, तो क्रिकेट यापुढे कशापद्धतीने क्रिकेट खेळतो. ” असं सांगत लेकाचं कौतुक केलं.
मुलाला मोठं क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न
विनोदने त्याच्या मुलाला त्याला मोठं आणि उत्तम क्रिकेटर बनवण्याचं स्वप्न असल्याचे सांगितले. तसेच वडिलांच्या आणि स्वत:च्या स्वप्नासाठी त्याचा मुलगाही प्रचंड मेहनत घेत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान विनोदला दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. यामध्ये मुलगा मोठा आहे, ज्याच्याबद्दल विनोद नेहमीच भरभरून बोलत असतो.
विनोद सध्याच्या घडीला व्यसनांपासून दूर आहे आणि त्याच्यावर काही उपचारही सुरु आहेत. यामधून विनोद कांबळी बाहेर येईल आणि आपल्या मुलाला एक चांगला क्रिकेटपटू बनवेल, अशी आशा बऱ्याच चाहत्यांना आहे.
तसेच विनोदला त्याने केलेल्या चुकांचा त्याला नक्कीच पश्चाताप होत आहे. पण आता विनोद त्याच्या मुलामध्ये क्रिकेटच आणि एका उत्तम क्रिकेटरचं स्वप्न पाहत आहे. त्यामुळे विनोद कांबळीचा मुलगा भविष्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.