विनोद कांबळीच्या आलिशान घरातील एक भिंत ‘या’ क्रिकेटरच्या फोटोंनी भरलेली, तर दुसऱ्या भिंतीवर पत्नीच्या खास आठवणी

| Updated on: Dec 17, 2024 | 2:29 PM

विनोद कांबळीचा मुंबईतील सर्वात महागड्या आणि पॉश एरियात असलेल्या आलिशान फ्लॅट पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. कांबळीचा फ्लॅट त्याच्या भव्य रचना आणि सुंदर इंटीरियरसाठी ओळखला जातो. पाहुयात त्याचं घर आतून कसं आहे ते.

विनोद कांबळीच्या आलिशान घरातील एक भिंत या क्रिकेटरच्या फोटोंनी भरलेली, तर दुसऱ्या भिंतीवर पत्नीच्या खास आठवणी
Follow us on

रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाच्या अनावरणा वेळी अनेक वर्षांनी तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांना एकाच मंचावर सर्वांनी पाहिलं. त्यावेळी विनोद कांबळीची सचिनने आपुलकीने विचारपूस केली. मात्र त्यावेळी विनोद कांबळीची आवस्था पाहून अनेकांना धक्का बसला. त्यानंतर मात्र त्याच्याबद्दल अनेक चर्चांना, विषयांना तोंड फुटले.

मुंबईती अलिशान घराची चर्चा

एकेकाळी भारतीय क्रिकेटटीमचा एक्का असलेल्या विनोद कांबळीची आता अशी अवस्था पाहून अनेकांनी खंत व्यक्त केली. विनोद कांबळीच्या अवस्थेबद्दल चर्चा तर झालीच पण सर्वात जास्त चर्चा झाली ती त्याच्या मुंबईती अलिशान घराची.

तुम्हाला माहितीये का की, मुंबईतील सर्वात महागड्या आणि पॉश एरियात असलेल्या वांद्रे पश्चिम येथे विनोद कांबळीचा कोट्यवधी रूपये किमतीचा आलिशान फ्लॅट आहे. आज हा फ्लॅट वादात आणि अडचणींत सापडला आहे.पण एक काळ असा होता की आपल्या शानदार कारकिर्दीसाठी आणि लक्झरी जीवनशैलीसाठी विनोद कांबळीची ओळख होती.

विनोद कांबळीचा फ्लॅट बाहेरून जेवढा लक्झरीअस आहे त्याहीपेक्षा तो आतून अलिशान आहे.थोडक्यात जाणून घेऊयात की विनोद कांबळीचे घर आतून नेमकं कसं आहे ते.

घरातील एक भिंत पत्नीच्या आठवणींनी भरलेली

विनोद कांबळीचा फ्लॅट हा मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील ज्वेल टॉवर अपार्टमेंटमध्ये आहे. हा 3-BHK फ्लॅट आहे ज्याची किंमत सुमारे 8 कोटी रुपये आहे. कांबळीचा फ्लॅट त्याच्या भव्य रचना आणि सुंदर इंटीरियरसाठी ओळखला जातो. या फ्लॅटमध्ये एक ओपन-स्टाईल किचन, एक मोठा लिव्हिंग आणि ड्रॉईंग रूम आहे.

सोबतच त्याची पत्नी अँड्रिया हेविट हिच्या पोर्ट्रेटसह सुशोभित केलेली भिंत आहे तर दुसऱ्या भिंतीवर सचिन तेंडुलकरसोबतची त्याची छायाचित्रे आहेत जी त्यांच्या मैत्रीची आणि त्या एका सुवर्णकाळाची आठवण करून देतात.

कांबळीने 2010 मध्ये हे घर घेतलं होतं तेव्हा त्याची किंमत 2 कोटी रुपये होती, ज्यासाठी कांबळीने DNS बँकेकडून सुमारे 55 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले होते पण, आता आर्थिक परिस्थितीमुळे कांबळी घराचा हप्ताही फेडू शकत नाहीत. तसेच स्वत:च्या घराची देखभाल करण्यासही तो सध्या असमर्थ असल्याचे दिसून येते.

घर चालवणे कठीण

विनोद कांबळीची सध्याची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. कांबळी याच्याकडे 10.5 लाख रुपये देखभाल शुल्क थकलेले आहे, ज्यासाठी 2013 मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. याशिवाय त्याने घर आणि कारचे कर्जही फेडले नसल्याचे म्हटले जाते.

बँकेने विनोद कांबळी याला डिफॉल्टर घोषित केले

तसेच, EMI न भरल्यामुळे कांबळीला बँकेकडून कॉल देखील येतात, ज्याला तो प्रतिसाद देत नाही. कांबळीच्या या सवयीला कंटाळून डीएनएस बँकेने पेपरमध्ये जाहिरात दिली, ज्यामध्ये कांबळी आणि त्यांच्या पत्नीला डिफॉल्टर घोषित करण्यात आलं. कर्ज न भरल्याने कांबळी यांच्यावर वांद्रे पोलीस ठाण्यात सुमारे 15 गुन्हे दाखल असल्याचीही माहिती आहे.

सध्याची कमाई काय?

बीसीसीआयकडून मासिक 30 हजार रुपये पेन्शन मिळते आणि आता हेच ​​त्याच्या जगण्याचे एकमेव साधन आहे. दारूच्या व्यसनामुळे त्याची प्रकृती बिघडली, त्यामुळे तो 14 वेळा रिहॅब सेंटरमध्ये गेला आहे. त्याची एकूण संपत्ती 12 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती, परंतु 2022 पर्यंत त्यांचे उत्पन्न 4 लाख रुपयांपर्यंत घसरले.

कांबळीने निवृत्तीनंतर काय केले

कांबळीने निवृत्तीनंतर “खेल भारती स्पोर्ट्स अकादमी” ही क्रिकेट अकादमी सुरू केली आणि बीकेसी, मुंबई येथे प्रशिक्षक म्हणूनही कामही केलं. पण ते काही फार काळ तो करू शकला नाही. त्यामुळे अडचणी वाढतच गेल्या आहेत आणि तो आजही या परिस्थितीशी लढत आहे. त्याची बिघडलेली तब्येत आणि आर्थिक परिस्थिती त्याच्या चाहत्यांनाही याबद्दल वाईट वाटतं.