मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली भावूक झाला. “जगाने क्रिकेट विश्वातील तुझे विक्रम पाहिले, मी माणूस पाहिला”, अशा शब्दात विराटने ट्विटरवर भावना व्यक्त केल्या आहेत (Virat Kohli getting emotional).
“प्रत्येक क्रिकेटपटूला आपली कारकिर्द एक ना एक दिवस थांबवावीच लागते. प्रवास एका दिवशी संपणार असतो. मात्र, एखादा असा व्यक्ती ज्याला तुम्ही खूप जवळून ओळखता तो व्यक्ती जेव्हा अशी निवृत्तीची घोषणा करतो तेव्हा मनात प्रचंड भावना दाटून येतात. तू देशासाठी जे योगदान दिलंय ते प्रत्येकाच्या मनात नेहमीच राहिल”, असं विराट कोहली म्हणाला आहे.
Every cricketer has to end his journey one day, but still when someone you’ve gotten to know so closely announces that decision, you feel the emotion much more. What you’ve done for the country will always remain in everyone’s heart…… pic.twitter.com/0CuwjwGiiS
— Virat Kohli (@imVkohli) August 15, 2020
“मला आपल्या दोघांमध्ये जे काही परस्पर आदर आणि प्रेम मिळालं ते नेहमीच माझ्या मनात राहिल. जगाने तुझे क्रिकेट विश्वातील विक्रम पाहिले आहे, मात्र मी एक माणूस पाहिला आहे. सुटून गेलेल्या त्या प्रत्येक गोष्टीसाठी मनापासून आभारी. मी तुझ्यासमोर नतमस्तक आहे”, असं विराट कोहली म्हणाला.
but the mutual respect and warmth I’ve received from you will always stay in mine. The world has seen achievements, I’ve seen the person. Thanks for everything skip. I tip my hat to you ??? @msdhoni
— Virat Kohli (@imVkohli) August 15, 2020
महेंद्रसिंह धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फोटो पोस्ट केले आहे. त्याशिवाय या व्हिडीओला ‘मै पल दो पल का शायर हूँ,’ हे गाणं शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे. “तुम्ही दिलेल्या आणि सपोर्टबद्दल धन्यवाद…1929 (म्हणजे संध्याकाळी 7.30) पासून मला निवृत्त समजावे,” असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे.
महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने अनेक सामने जिंकले आहेत. 2008 ते 2014 दरम्यान धोनी कसोटी सामन्यांचा कर्णधार होता. त्याने 2007 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत टी-20 ट्रॉफी जिंकली होती. 2010 आणि 2016 साली त्याने आशिया कप जिंकला आहे. 2011 साली त्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2013 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील जिंकली होती.
हेही वाचा : MS Dhoni Retirement | महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
39 वर्षीय महेंद्रसिंह धोनीने भारतीय क्रिकेटला नवं आयाम दिलं. धोनीने भारताला पहिला टी 20 विश्वचषक, 2011 मध्ये वन डे विश्वचषक आणि भारतीय संघाला कसोटीमध्ये अव्वलस्थान असं सर्व काही मिळवून दिलं. धोनीने तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळली.
धोनीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. मर्यादित षटकांच्या फॉर्मेटमध्ये त्याला प्रभावी ‘फिनिशर’ म्हटलं जातं. त्याला सर्वोत्तम विकेट-कीपरदेखील मानलं जातं.
धोनीची कसोटी सामन्यातील कारकीर्द
महेंद्र सिंह धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळले. या कसोटी सामन्यांमध्ये त्याने 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक केले आहेत. त्याने कसोटी सामन्यात एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत.
धोनीने 350 एकदिवसीय सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे.
हेही वाचा : Suresh Raina | मी सुद्धा तुझ्यासोबत, धोनीपाठोपाठ रैनाचीही निवृत्तीची घोषणा
धोनी आपल्या कारकीर्दीत 98 टी-20 सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीने 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.
धोनीने आपल्या कारकिर्दीत एकूण 16 शतक केले आहेत. यामध्ये 10 शतक हे एकदिवसीय सामन्यांमधील आहेत. तर 6 शतक हे मालिका सामन्यांमधील आहेत.
दरम्यान, महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अनेक दिग्गजांनी धोनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
भारतीय क्रिकेटला जिंकण्याची सवय लावणारा ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे.कर्णधार म्हणून त्याने भारतीय क्रिकेटला दिलेले योगदान अनमोल आहे.त्याला भावी कारकीर्दीसाठी खुप खुप शुभेच्छा.@msdhoni#Dhoni pic.twitter.com/Zv3xBW35ez
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) August 15, 2020
बॅटिंग करताना तू मारलेला प्रत्येक यादगार फटका, किपिंग करताना तू अनेकांच्या उडवलेल्या दांड्या आणि कर्णधार म्हणून घेतलेला एक एक निर्णय क्रिकेट चा इतिहास आणि भारतीय रसिक कधीच विसरणार नाहीत! तुझा खेळ सदैव आठवणीत राहील. @msdhoni announces retirement from International cricket. pic.twitter.com/bxq7EvuYT8
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 15, 2020
शून्यातून विश्व निर्माण करण्याचा विश्वास देशवासियांना देणारा आणि कोट्यावधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं विश्वचषकाचं स्वप्न पूर्ण करणारा महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. धोनीनं मैदानातून निवृत्ती घेतली, तरी चाहत्यांच्या ह्रदयातील स्थान अबाधित राहील!#MSDhoni pic.twitter.com/mhpf0sBplf
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) August 15, 2020