Perth Test : गौतम गंभीरसोबत विराट कोहलीच जमत नाहीय का? पर्थ टेस्टआधी खळबळजनक दावा

| Updated on: Nov 15, 2024 | 11:01 AM

Perth Test : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 22 नोव्हेंबरपासून कसोटी सामना सुरु होणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना पर्थमध्ये होणार आहे. त्याआधी एक चक्रावून टाकणारा दावा समोर आलाय. टीम इंडियाचा सध्याचा फॉर्म चिंतेचा विषय आहे.

Perth Test : गौतम गंभीरसोबत विराट कोहलीच जमत नाहीय का? पर्थ टेस्टआधी खळबळजनक दावा
virat kohli team india cricket
Image Credit source: PTI
Follow us on

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना पर्थ येथे खेळला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 22 नोव्हेंबरपासून कसोटी सामना सुरु होणार आहे. त्याआधी हैराण करणारा एक दावा समोर आलाय. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेंडन जुलियनने 5 टेस्ट मॅचच्या सीरीजआधी अनेक दावे केले आहेत. जुलियननुसार भारतीय टीमसमोर अनेक आव्हान आहेत. पर्थमध्ये ऑस्ट्रेलियन टीम चार दिवसात जिंकू शकते, असं त्याचं म्हणणं आहे. फॉक्स क्रिकेटवर बोलताना जुलियनने टीम इंडियाची सर्वात मोठी चिंता विराट कोहली असल्याचा म्हणाला. भारतीय कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्यासोबत ताळमेळ बसवणं विराटला जमत नसल्याचा दावा जुलियनने केला आहे.

विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियात चर्चेचा विषय बनलाय. ऑस्ट्रेलियन मीडियापासून तिथले दिग्गज विराटच्या फ़ॉर्मबद्दल बोलत आहेत. 1993 ते 1999 दरम्यान ऑस्ट्रेलियासाठी 7 टेस्ट आणि 25 वनडे खेळलेल्या ब्रेंडन जुलियनने कोहलीबद्दल हैराण करणारे दावे केले. न्यूझीलंड विरुद्ध विराट ज्या पद्धतीने आऊट झाला, ते भारतीय टीमच्या दृष्टीने चिंताजनक असल्याच जुलियन म्हणाला. जुलियननुसार विराट कोहली सध्या आपल्या बेस्ट फॉर्ममध्ये नाहीय. रोहित आणि कोहलीसोबत त्याच जमत नाहीय. त्याची खेळण्याची पद्धत टीमशी सुसंगत नाहीय असं जुलियन म्हणणं आहे.

फक्त चार दिवसात…

जुलियनने पर्थ कसोटीबद्दलही हैराण करणारा दावा केला. पर्थमध्ये ऑस्ट्रेलियन टीम भारताला फक्त चार दिवसात हरवेल असा त्याचा दावा आहे. त्यामागची कारणं सुद्धा त्याने सांगितली. टीम इंडियाचे फलंदाज आणि गोलंदाज दोघांचा फॉर्मसाठी संघर्ष सुरु आहे, असं तो म्हणाला. रोहित शर्मा पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी आहे. जसप्रीत बुमराह कॅप्टन असू शकतो. “त्याच्यावर ओपनिंग बॉलर आणि कॅप्टन म्हणून दबाव असेल. अचानक एका महत्त्वाच्या सीरीजमध्ये कॅप्टनशिपचा दबाव येऊ शकतो” असं जुलियनच मत आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन पॅट कमिन्सची टीम पहिली टेस्ट जिंकण्यासाठी फेवरेट असल्याच त्याने सांगितलं.