मुंबई : शेतकरी आंदोलनाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने या मुद्द्यावर ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. त्यानंतर क्रिकेट विश्वातील आणखी काही दिग्गजांनी या विषयावर ट्विट केलं आहे. या सर्व घडामोडी घडत असताना टीम इंडियाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाल्याची माहिती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने दिली. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याबाबत रणनिती आखण्याबाबत ही बैठक आयोजित करण्यात आली होती (Virat Kohli says we discuss on farmers protest in team meeting).
उद्यापासून सुरु होणाऱ्या चेन्नई टेस्टच्या अगोदर टीम इंडियाची बैठक झाली. या बैठकीत शेतकरी आंदोलनावरही चर्चा झाली, असं विराट कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितलं. चेन्नई टेस्टच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी टीम इंडियाची व्हर्चूअल पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शेतकरी आंदोलनाबाबत विराटला प्रश्न विचारला असता, त्याने याबाबत सविस्तर माहिती दिली (Virat Kohli says we discuss on farmers protest in team meeting).
Any issue which is present in the country, we do talk about it & everyone has expressed what they had to say about the issue. We briefly spoke about it in the team meeting and then we carried on discussing the team’s plans: Team India Captain Virat Kohli (File pic)#FarmLaws pic.twitter.com/sgqOASbU2D
— ANI (@ANI) February 4, 2021
नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या विषयावर टीम इंडियाच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी सर्वच खेळाडूंनी आपापले विचार मांडले, असं विराट कोहलीने सांगितलं. विराट कोहलीने याआधी शेतकरी आंदोलनावर ट्विट करुन आपली भूमिका मांडली होती.
मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकजूट राहिले पाहिजे. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि मला खात्री आहे की सर्व पक्षांमध्ये शांततेचा तोडगा निघेल जेणेकरून शांतता राहील आणि सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ शकतील, असं ट्विट विराट कोहलीने केलं.
सचिन तेंडुलकरचं ट्विट
भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले आहे.
संबंधित बातम्या:
जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !
Farmer Protest: भारतासाठी काय चांगलं हे आम्हाला कळतं, बाहेरच्यांनी नाक खुपसू नये: सचिन तेंडुलकर