मुंबईः विराह कोहलीने (Virat Kohli) एकदिवसीय सामने, टी 20 नंतर आता कसोटीचेही कर्णधारपद सोडले आहे. त्याच्या या निर्णयामुळे क्रीडाप्रेमी हैराण झालेत. इतक्या तडकाफडकी तो एकानंतर एक कर्णधारपद सोडेल असे कोणालाही वाटते नव्हते. मीडिया रिपोर्टनुसार विराटने बीसीसीआयशी (BCCI) याबाबत कसलिही चर्चा केली नाही. फक्त संघाच्या खेळाडूंना याची त्याने माहिती दिली होती. केपटाऊन कसोटी सामना संपल्यानंतर 24 तासांनी त्याने कर्णधारपदाला रामराम ठोकला. गेल्या तीन महिन्यात ज्याप्रकारे त्याला तीन कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले, त्यावरून त्याच्या डोक्यावर टांगती तलवार असल्याचे समजते.
खराब कामगिरी
कसोटी क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीने धावा करणाऱ्या विराट कोहलीची गेल्या दोन वर्षांपासून खराब कामगिरी सुरूय. त्याने 15 कसोटी सामन्यांमध्ये केवळ 6 अर्धशतक केलीयत. विराटने 27 डावात खेळताना 28.14 च्या सरासरीने फक्त 760 धावा केल्या आहेत. आता अजिंक रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीवर नजर टाकू. रहाणेने गेल्या दोन वर्षांत फक्त 19 कसोटी सामने खेळले. त्यात24.08 च्या सरासरीने 819 धावा केल्यात. तर चेतेश्वर पुजाराने गेल्या 2 वर्षांत 20 कसोटी सामन्यांमध्ये 26.29 च्या सरासरीने 973 धावा केल्या आहेत. म्हणजेच विराट कोहली, अजिंक रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या कामगिरीत जास्त अंतर नाही. आता जेव्हा पुजारा आणि रहाणेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उमटत आहे, तर मग विराटच्या कामगिरीवर का नाही? विराट कोहलीने तसेही कर्णधारपद सोडले आहे. सध्याच्या संघ व्यवस्थापनालाही त्याच्याबद्दल विश्वास वाटत नसल्याचे समजते. त्यामुळे विराट काही काळात मोठा निर्णय घेणार का, की निवड समितीच काही मोठा निर्णय घेणार हे पाहावे लागेल.
सारे काही अलबेल नाही
विराट कोहली आणि बीसीसीआयमध्येही सारे काही अलबेल नसल्याचे समजते. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने विराटला एकदिवसीय सामन्याच्या कर्णधारपदावरून हटवले होते. त्यानंतर विराटने बीसीसीआय आणि सौरव गांगुलीला लक्ष्य केले. गांगुली यांनी आपल्याला विराटने टी 20 चे कर्णधारपद सोडू नये, असे वाटत असल्याचे म्हटले होते. त्यांनी विराटला त्याबद्दल विरोधही केला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेपूर्वीच्या दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने गांगुलीचे म्हणणे खोडून काढले. आता तर विराट कर्णधारही नाही. त्यामुळे त्याची कामगिरी खराब झाली, तर त्याला इतर खेळाडूंप्रमाणे परिणाम भोगावे लागू शकतात.
Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली