विराट कोहलीचा नवा हेअरकट ट्रेंडमध्ये; मेलबर्न टेस्टपूर्वी बदलला लूक, दिसतोय खूपच डॅशिंग

| Updated on: Dec 21, 2024 | 4:37 PM

विराट कोहलीचा नवा हेअरकट भलताच ट्रेंडमध्ये आला आहे. त्याच्या नवीन हेअरकटचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. विराटचा नवा लूक चाहत्यांच्या फारच पसंतीस पडत आहे.

विराट कोहलीचा नवा हेअरकट ट्रेंडमध्ये; मेलबर्न टेस्टपूर्वी बदलला लूक, दिसतोय खूपच डॅशिंग
Follow us on

भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचे करोडो फॅन आहेत. त्याच्या कपड्यांच्या स्टाइलपासून ते त्याच्या हेअरस्टाइलपर्यंत सर्वजन त्याला फॉलो करतात.
कोहली जे काही करतो तो जगात एक नवा ट्रेंड बनतो. मग त्याची हेअर स्टाईल असो, दाढी असो किंवा मग फिटनेस किंवा मग त्याने काढलेला टॅटू. विराटने अजून एक नवा ट्रेंड त्याच्या चाहत्यांसाठी आणला आहे. तो म्हणजे त्याची नवी हेअरस्टाइल.

विराट कोहलीचा नवा हेअरकट ट्रेंडमध्ये

विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियामध्ये असून तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाचा भाग आहे. भारत – ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथी टेस्ट 26 डिसेंबर पासून मेलबर्न येथे होणार आहे. त्यापूर्वी विराटने नवा हेअर कट केला असून सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराटने ऑस्ट्रेलियातील एका हेअर स्टायलिस्टकडून नवा हेअरकट केला असून या लूकमध्ये कोहली अजूनच डॅशिंग दिसतोय. विराटचा हेअरकट त्याचे चाहते खूप पसंत करत आहेत. आता भारताच्या स्टार क्रिकेटरचा हा लूक त्याच्या फॅन्ससाठी नवीन ट्रेंड बनणार यात कोणतीच शंका नाही. विराटचा हा लूक त्याच्यावरही फार खुलून दिसत आहे . या लूकमुळे त्याची वेगळीच पर्सनॅलिटी आणि आत्मविश्वासाने भलेला अ‍ॅटिट्यूड दिसून येत आहे.

मेलबर्न एअरपोर्टवर पत्रकारांवर भडकला विराट

चौथ्या टेस्ट सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ दोन दिवसांपूर्वी मेलबर्नमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान यावेळी विमानतळावर भारतीय क्रिकेटर विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाचा प्रसारमाध्यमांशी वाद झाला. मीडियाकडून परवानगीशिवाय आपल्या मुलांना शूट केलं जात आहे समजलं तेव्हा विराट कोहली पत्रकारांवर संतापला. यावेळी विराटने आपली भूमिका स्पष्ट करत म्हटलं “मला माझ्या मुलांसह प्रायव्हसी हवी आहे. मला विचारल्याशिवाय तुम्ही शूट करु शकत नाही,” असं त्याने बजावलं.

त्यानंतर पत्रकार आणि कॅमेरामनने विराट कोहलीला त्याच्या कुटुंबातील सदस्यांना शूट केलं जात नसल्याचं समजावून सांगितलं. यानंतर हा वाद मिटला आणि जाण्यापूर्वी विराट कोहलीने कॅमेरामनसह हातही मिळवला.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीचं वेळापत्रक काय?

पहिली टेस्‍ट: 22 ते 26 नोव्हेंबर
दुसरी टेस्‍ट: 6 ते 10 डिसेंबर
तिसरी टेस्‍ट: 14 ते 18 डिसेंबर
चौथी टेस्‍ट: 26 ते 30 डिसेंबर
पाचवी टेस्‍ट: 3 ते 7 जानेवारी

कुठे पाहता येणार सामना?

एडिलेड येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार दुसरा टेस्ट सामना हा प्रेक्षकांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स आणि डीडी स्पोर्ट्स या चॅनलवर पाहता येईल. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिझनी हॉटस्टारवर करण्यात येईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 5 वाजता सुरु होईल.