मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवर वासिम जाफर याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वासिम जाफरने उत्तराखंड क्रिकेट संघाचं प्रशिक्षक म्हणून काम पाहताना, धर्म पाहून खेळाडूंची नियुक्ती केल्याचा आरोप उत्तराखंड क्रिकेट संघाचे सचिव माहिम वर्मा यांनी केलाय. या आरोपांचं जाफरने खंडन केलं आहे. वासिम जाफरने आपल्यावरील आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. वासिमच्या समर्थनार्थ माजी क्रिकेटपटू आणि कोच अनिल कुंबळे मैदानात उतरला आहे (Wasim Jaffer gets support from Anil Kumble Irfan Pathan and many more cricketers).
अनिल कुंबळेने ट्विट करत वासिम जाफरला पाठिंबा दिला आहे. “वासिम, मी तुझ्यासोबत आहे. तू जे केलं ते योग्य केलं. मला तर आता त्या खेळाडूंची किव येते जे आता तुझ्याकडून प्रशिक्षण घेऊ शकणार नाहीत”, असं अनिस कुंबळे म्हणाला आहे (Wasim Jaffer gets support from Anil Kumble Irfan Pathan and many more cricketers).
1. I recommended Jay Bista for captaincy not Iqbal but CAU officials favoured Iqbal.
2. I did not invite Maulavis
3. I resigned cos bias of selectors-secretary for non-deserving players
4. Team used to say a chant of Sikh community, I suggested we can say “Go Uttarakhand” #Facts https://t.co/8vZSisrDDl— Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 10, 2021
अनिल कुंबळे नंतर इरफान पठाण आणि मनोज तिवारी यांनी देखील ट्विट करत वासिमला पाठिंबा दर्शवला आहे. याबाबत वासिमला स्पष्टीकरण द्यावं लागत आहे, याची खंत वाटते, असं पठाण म्हणाला. तर याविषयी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलेन, असं मनोज तिवारी म्हणाला.
1. I recommended Jay Bista for captaincy not Iqbal but CAU officials favoured Iqbal.
2. I did not invite Maulavis
3. I resigned cos bias of selectors-secretary for non-deserving players
4. Team used to say a chant of Sikh community, I suggested we can say “Go Uttarakhand” #Facts https://t.co/8vZSisrDDl— Wasim Jaffer (@WasimJaffer14) February 10, 2021
I would request the Chief Minister of Uttarakhand (BJP) Mr.Trivendra Singh Rawat 2 intervene immediately nd take note of the issue in which our National hero Wasim bhai was branded as communal in the Cricket Association nd take necessary action.Time 2 Set an example #WasimJaffer pic.twitter.com/ZPcusxuo7v
— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) February 11, 2021
माहिम वर्मांच्या आरोपानुसार, “मंगळवारी काही खेळाडू माझ्याकडे आले, त्यांनी जे सांगितलं ते हैराण करणारं होतं. जाफर टीममध्ये धार्मिकीकरण करत असल्याचं खेळाडूंचं म्हणणं होतं. काही खेळाडू रामभक्त हनुमान की जय ही घोषणा देऊ इच्छित होते. मात्र जाफरने त्यांना रोखलं. इतकंच नाही तर काही दिवसांनी बायो-बबल ट्रेनिंगमध्ये एक मौलवी आले आणि त्यांनी मैदानात दोनवेळा नमाज पठण केलं. मात्र या ट्रेनिंगमध्ये एक मौलवी प्रवेशच कसे करु शकतात? मी खेळाडूंना आपल्याला आधी का सांगितलं नाही असा प्रश्न केला”
दरम्यान, वासिम जाफरने आपल्यावरील आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. जाफर म्हणाला, “सर्वात आधी मला हे स्पष्ट करायचं आहे की, रामभक्त हनुमान की जय ही घोषणा कधीच दिली गेली नाही. जेव्हा आम्ही प्रॅक्टिस मॅच खेळत होतो, तेव्हा खेळाडू ‘राणी माता सच्चे दरबार की जय’ अशी घोषणा देत होते. मी कधीच त्यांना जय हनुमान किंवा जय श्रीरामचा नारा देताना पाहिलं नाही. तो एक शीख धर्मियांचा नारा होता. टीममधील दोन शीख खेळाडू ही घोषणा देत होते.
जाफर म्हणाला, “ज्यावेळी आम्ही बडोद्याला पोहोचलो, त्यावेळी मी खेळाडूंना सांगितलं, आम्ही एका धर्मासाठी नाही तर उत्तराखंडसाठी खेळत आहोत. त्यामुळे आपली घोषणा उत्तराखंडसाठी हवी. आपली घोषणा, “गो उत्तराखंड, लेट्स डू इट उत्तराखंड आणि कमऑन उत्तराखंड” अशी हवी. जर मला धर्मालाच प्रमोट करायचं असतं, प्रसार किंवा प्रचार करायचा असता तर मी अल्लाह-हू-अकबरचा नारा द्यायला सांगितलं असतं. त्यामुळे माझ्यावरील धार्मिक आरोप चुकीचा आहे”
43 वर्षीय वासिम जाफर हा भारताचा अत्यंत तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखला जातो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जाफरने धावांचा रतीब घातला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने तब्बल 57 शतकं झळकावली आहेत. 260 प्रथम श्रेणी सामन्यात जाफरने तब्बल 19 हजार 410 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 57 शतकं आणि 91 अर्धशतकं ठोकली. नाबाद 314 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.
हेही वाचा : जय श्रीरामच्या घोषणा रोखल्या, मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य, वासिम जाफरवर गंभीर आरोप