मुंबई : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) चांगल्या टीमचा छोट्या टीमनी पराभव केल्याचं पाहायला मिळालं. T20 फॉरमॅटमध्ये अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. सुरुवातीच्या सामन्यात श्रीलंका (Shri lanka) आणि वेस्टइंडीज या दोन्ही टीमचा छोट्या टीमनी पराभव केला. विशेष म्हणजे वेस्टइंडिज टीमला (West Indies) उपांत्य फेरी देखील गाठता आली नाही. त्यामुळे वेस्टइंडीज क्रिकेटबोर्ड टीमची चौकशी करणार आहे. चौकशीसाठी वेस्टइंडीज टीमच्या माजी दिग्गज खेळाडूंची समिती नेमण्यात आली आहे.
विश्वचषक स्पर्धेत आर्यलॅंड आणि स्कॉटलॅंड या दोन टीमकडून वेस्टइंडीज टीमचा पराभव झाला. त्यानंतर टीममधील खेळाडूंवर जोरदार टीका करण्यात आली होती. विशेष म्हणजे सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले होते. त्यावेळी वेस्टइंडीज टीमच्या माजी खेळाडूंनी सुद्धा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.
वेस्टइंडिज टीमचा माजी खेळाडू ब्रायन लारा सुद्धा चौकशी समितीमध्ये आहे. खेळाडूंची चौकशी झाल्यानंतर त्याचा जो काही अहवाल असेल तो वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डला सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर टीममध्ये मोठा बदल करण्यात येणार असल्याचे सुचक वक्तव्य वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डकडून करण्यात आलं आहे.
वेस्टइंडिज टीमचं कर्णधारपद पोलार्डने अचानक सोडल्यानंतर वेस्टइंडिज टीम पुढे मोठा पेच निर्माण झाला होता. त्यावेळी टीमचं नेतृत्व निकोलस पूरन याला देण्यात आलं. निकोलस पूरन याने कर्णधारपदाच्या सुरुवातीच्या काळात चांगली कामगिरी केली. त्यानंतर संपुर्ण
टीमची सांघिक खेळी बिघडली.