Suryakumar Yadav: सुर्यकुमार यादवचा क्रिकेट खेळताना आत्मविश्वास कसा वाढतो? सर्व प्रकारची गुपिते उघडली

| Updated on: Nov 21, 2022 | 8:45 AM

सुर्यकुमार यादव कसा वाढतो आत्मविश्वास, त्यांच्या मागचं गुपित तुम्हाला माहित आहे का ?

Suryakumar Yadav: सुर्यकुमार यादवचा क्रिकेट खेळताना आत्मविश्वास कसा वाढतो? सर्व प्रकारची गुपिते उघडली
Surykumar yadhav
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मागच्या काही दिवसांपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आशिया चषकात (Asia Cup) चांगली कामगिरी केल्यानंतर त्याने, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिके विरुद्धच्या मालिकेत गोलंदाजांची चांगली धुलाई केली. त्यावेळी दोन्ही मालिका टीम इंडियाने जिंकल्या. विश्वचषक स्पर्धेत (T20 World cup 2022) सुर्यकुमार यादवे चांगल्या गोलंदाजांची धुलाई केली. त्यामुळे त्याला गोलंदाजी करणं अवघड असल्याचं माजी खेळाडूंनी स्पष्ट केलं होतं

काल टीम इंडियाची दुसरी T20 मॅच न्यूझिलंडविरुद्ध झाली. कालच्या मॅचमध्ये न्यूझिलंडच्या गोलंदाजांची यादवे चांगलीचं धुलाई केल्याचं पाहायला मिळालं त्याने 49 चेंडूत शतक झळकावलं. त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला. कालची सुर्यकुमार यादवची खेळी पाहिल्यानंतर न्यूझिलंडचा कर्णधार विल्यमसन म्हणाला की, अशी खेळी मी आतापर्यंत पाहिली नाही.

ज्यावेळी सुर्यकुमार यादव क्रिकेटमधून ब्रेक घेतो, त्यावेळी तो त्याच्या कुटुंबियांसोबत मुंबईतल्या घरी असतो. त्यावेळी तो त्याच्या आई-वडिलांशी अधिक बोलत असतो. तसेच त्याच्या बायकोला सुद्धा अधिक वेळ देत असतो. घरच्यांशी बोलत असताना तो कामाच्या संदर्भात अजिबात चर्चा करीत नाही असं सुर्यकुमार यादवने सांगितलं.

हे सुद्धा वाचा

माझा आत्मविश्वास कायम आहे आणि असतो. ज्यावेळी मी मैदानात उतरतो त्यावेळी 99 आत्मविश्वास माझा वाढलेला असतो. विशेष म्हणजे मला जीमला जायचं आहे. वेळेत जेवायचं आहे या सगळ्या गोष्टींवर मी लक्ष देत असतो असंही सुर्यकमार यादवने सांगितले.

सुर्यकुमार यादव म्हणतो की, मी कधीही चांगली खेळी केली याचा विचार करीत नाही. त्याचबरोबर माझ्याकडून चांगली खेळी होईल याचाही विचार करीत नाही. मैदानावर असताना वास्तव पाहून खेळतो. समजा तु्म्ही विचार केला, की हा गोलंदाज चांगला आहे. तर तुमची कामगिरी निराशाजनक होऊ शकते अशी माहिती एक वेबसाईटने दिली आहे.