IND vs NZ : मोहम्मद शमी याच्या ड्रेसिंग रूममध्ये… ऐतिहासिक कामगिरीनंतर काय घडलं?

| Updated on: Nov 16, 2023 | 1:26 PM

Mohammed Shami : IND vs NZ वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये मोहम्मद शमी याची सुवर्ण कामगिरी, सात विकेट घेतल्यानंतर क्रिकेटपटू ड्रेसिंग रुममध्ये पोहोचला आणि...; सध्या सर्वत्र मोहम्मद शमी याच्या कामगिरीची चर्चा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शमी याची चर्चा

IND vs NZ : मोहम्मद शमी याच्या ड्रेसिंग रूममध्ये... ऐतिहासिक कामगिरीनंतर काय घडलं?
Follow us on

Mohammed Shami : बुधवारी झालेल्या भारत आणि न्यूझीलंड सामन्यात यश मिळाल्यामुळे वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचं स्थान पक्क झालं आहे. आता सर्व भारतीयांचं लक्ष फक्त आणि फक्त वर्ल्ड कप फायनलकडे आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्या सुवर्ण कामगिरीमुळे भारताला फायनलमध्ये स्थान मिळालं असं म्हणायला हरकत नाही. शमीने विकेट काढून भारताला शानदार विजय मिळवून दिला. वनडे क्रिकेटमध्ये त्याने चौथ्यांदा पाच विकेट्स घेतल्या. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मोहम्मद शमी याची चर्चा रंगलेली आहे. सोशल मीडियावर देखील सर्वत्र मोहम्मद शमी याची चर्चा रंगली आहे.

सेमी फायनलमधील मोहम्मद शमी याच्या शानदार कामगिरीमुळे बुधवारी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कारही देण्यात आला. भारताला मिळालेल्या विजयानंतर सर्वत्र फक्त आणि फक्त मोहम्मद शमी याच्या नावाची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर त्याच्या कौतुकाच्या पोस्ट्स पडत आहेत. एवढंच नाही तर, मोहम्मद शमी याच्यावर अनेक मीम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

 

 

वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये मोहम्मद शमी याने विकेट काढल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये नक्की काय घडलं? यावर आधारित एक मीम सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मीममध्ये अभिनेता अजय देवगन दिसत आहे. या मीम शिवाय अनेक मीम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

 

 

 

 

सध्या मोहम्मद शमी त्याच्या कामगिरीमुळे चर्चेत आहे. पण काही दिवसांपूर्वी मोहम्मद शमी त्याच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत होता. शमीची पत्नी हसीन जहाँ गेल्या अनेक वर्षांपासून पतीपासून दूर राहत आहे. ‘भारतीय संघाला शुभेच्छा देईल पण, शमीला नाही…’ असं वक्तव्य शमी याच्या पत्नीने केलं होतं.