World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड सामना, ‘वडा पाव’ का होतोय ट्रेन्ड, रोहित शर्माचे चाहते नाराज?

| Updated on: Nov 16, 2023 | 1:07 PM

World Cup 2023 : वर्ल्ड कप आणि 'वडा पाव'चं काय आहे कनेक्शन? सोशल मीडियावर 'वडा पाव' का होतोय ट्रेन्ड, एवढंच नाही तर, रोहित शर्माचे चाहते का आहेत नाराज? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्याची चर्चा...

World Cup 2023 :  भारत आणि न्यूझीलंड सामना, वडा पाव का होतोय ट्रेन्ड, रोहित शर्माचे चाहते नाराज?
Follow us on

World Cup 2023 : वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचं स्थान पक्क झालं आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडचा दारुन पराभव केला आहे. सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने भारताला शानदार सुरुवात करून दिली. वर्ल्ड कप फायनलमध्ये रोहित याने पहिल्याच षटकात चौकार आणि षटकारांची फटकेबाजी केली. रोहितने शुभमन गिलच्या साथीने 71 धावा केल्या. बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव करत वर्ल्ड कप फायनलमध्ये स्थान पक्क झालं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या विजयामुळे देशात सर्वत्र जल्लोषाचं वातावरण आहे.

सध्या देशात जल्लोषाचे वातावरण असताना ‘वडा पाव’ ट्रेन्ड करत आहे. अशात वर्ल्ड कप आणि वडा पावचं काय कनेक्शन असेल? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. सांगायचं झालं तर, जेव्हा रोहित शर्मा खेळत होता तेव्हा हर्षा भोगले यांनी असं काही वक्तव्य केलं, ज्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.

‘माझा वडा पाव कोणीतरी सांभाळा’

जेव्हा रोहित शर्मा चौकार आणि षटकारांसह आक्रमक फलंदाजी करत होता. तेव्हा हर्षा भोगले म्हणाले, ‘कोणीतरी माझा वडा पाव सांभाळा’. हर्षा भगोले असं का म्हणाले असतील.. याबद्दल काहीही कळू शकलेलं नाही. पण ही गोष्ट राहित शर्मा याच्या चाहत्यांना बिलकूल आवडलेली नाही.

 

 

 

हर्षा भोगले यांच्या कमेंटवर मीम्स

‘कोणीतरी माझा वडा पाव सांभाळा…’ हर्ष भोगले यांच्या या वक्तव्यावर सध्या मीम्सचा वर्षावर होत आहे. सध्या सर्वत्र फक्त भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या सामन्याची चर्चा रंगली आहे. अशात हर्ष भोगले वक्तव्य देखील चर्चेत आहे…

 

 

सांगायचं झालं तर, हर्षा भोगले एक भारतीय क्रिकेट कमेंटेटर आणि पत्रकार देखील आहेत. हर्षा भोगले यांचं क्रिकेट या खेळावर प्रचंड बारीक लक्ष असतं. ते कायम क्रिकेटवर वक्तव्य करत असतात. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात ते कॉमेंट्री करताना दिसले.