Wrestler Protest | कुस्तीपटू गंगेत मेडल विसर्जित करण्यासाठी पोहोचले आणि ओक्साबोक्शी रडू लागले

| Updated on: May 30, 2023 | 6:44 PM

खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याने अखेर आंदोलक कुस्तीपटूंनी आपले मेडल्स गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी ते हरिद्वारमध्ये गंगा घाटावर पोहोचले. यावेळी खेळाडू अत्यंत भावूक झाले. खूप मेहनत करुन कमावलेले मेडल्स गंगेत विसर्जित करण्यात येत असल्याने ते अक्षरश: ओक्साबोक्शी रडू लागले.

Wrestler Protest | कुस्तीपटू गंगेत मेडल विसर्जित करण्यासाठी पोहोचले आणि ओक्साबोक्शी रडू लागले
Follow us on

हरिद्वार : एखाद्या खेळाडूचं आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न काय असू शकतं? तर त्याने ऑलिम्पिकमध्ये जावून पदक कमवावं. ऑल्मिम्पिकमध्ये जावून देशाचं प्रतिनिधित्व करावं आणि देशासाठी पदक जिंकून द्यावं. त्यासाठी ते खेळाडू किती मेहनत करतात हे शब्दांत कधीच सांगता येणार नाही. कारण कित्येक रात्र, कित्येक दिवस ते यासाठी झटलेले असतात. खूप खस्ता खाललेल्या असतात. पण आज भारतातील अशाच खेळाडूंवर ही सर्व पदकं गंगा नदीच्या पात्रात विसर्जित करण्याची नामुष्की ओढावली आहे. या खेळाडूंनी खासदार ब्रृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.

ब्रृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी त्यांच गेल्या दीड महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन सुरु आहे. पण केंद्र सरकारडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांनी थेट गंगा नदीत आपले मेडल्स विसर्जित करण्याचं ठरवलं आहे.

कुस्तीपटू अतिशय भावूक

साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया असे भारताचे दिग्गज कुस्तीपटू आज हरिद्वार येथे गंगा घाटावर दाखल झाले आहेत. ते गंगा नदीत आपले सर्व मेडल्स विसर्जित करत आहेत. खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नसल्याने अखेर आंदोलक कुस्तीपटूंनी आपले मेडल्स गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी आंदोलक कुस्तीपटू हरिद्वार येथे गंगा किनाऱ्यावर दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून गंगा नदीत मेडल्स विसर्जित करण्यात येत आहेत. कुस्तीपटूंसाठी हा अतिशय कठीण प्रसंग आहे.

हे सुद्धा वाचा

अनेक आंदोलक कुस्तीपटू ओक्साबोक्शी रडत आहेत. ते मेडल्स गंगेत सोडण्यापूर्वी अत्यंत भावूक झाले आहेत. त्यांची अनेक वर्षांची तपश्चर्या आज ते पणाला लावत आहेत. ऑलिम्पिकमध्ये मेडल्स कमवणं ही खूप मोठी गोष्ट असते. पण आज त्यांना हीच मेडल आपल्या हातांनी गंगा नदीत विसर्जित करण्यात येत आहेत. या खेळाडूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. पण त्यांच्या आरोपांनंतर सरकारकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

कुस्तीपटूंना पोलिसांकडून अतिशय वाईट वागणूक

आंदोलक कुस्तीपटूंना गेल्या काही दिवसांपासून अतिशय वाईट वागणूक मिळाल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पोलिसांकडून आंदोलन मोडून काढण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न केले जात असल्याचे हे या संबंधित व्हिडीओत दिसत असल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अनेकजण कुस्तीपटूंच्या बाजूने उभे आहेत. पण सरकारकडून आपल्या आरोपांची कोणतीही दखल घेतली जात नसल्याने कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत.