चंदीगड : वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट अर्थात WWE मधील सर्वात यशस्वी भारतीय रेसलर म्हटलं तर द ग्रेट खली (The Great Khali). मूळचा हिमाचल प्रदेशचा असणाऱ्या खलीचे खरे नाव दलीप सिंग राणा आहे. सध्या खली WWE मध्ये खेळत नसल्याने तो भारतातच आहे. दरम्यान या कोरोना काळात खलीला मात्र एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. खलीला त्याच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहते विविध प्रकारच्या मजेशीर मागण्या करत आहेत. तसेच खलीचे विविध मीम्सही व्हायरल करुन त्याला ट्रोल केलं जात आहे. या सर्व ट्रोलिंगला वैतागून खलीने एक पाऊल उचलले आहे. (WWE Wrestler The Great Khali Turned Off his comment section due to trolling)
खलीने आपल्या सोशल मीडियवरील पोस्टना असणारे कमेंट सेक्शनच बंद करुन टाकले आहे. फॅन्सच्या ट्रोलिंगला वैतागून खलीने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. खली सोशल मीडियवर कमालीचा सक्रिय असल्याचे कायम दिसून येते. त्यातच कोरोनाकाळात सर्वच ठप्प असल्याने खली सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाला असून तो अनेकदा आपल्या फॅन्सच्या कमेंटना रिप्लाय करत त्यांच्याशी संवाद साधत असतो. मात्र मागील काही दिवसांपासून फॅन्सने खलीला विचित्र कमेंट करुन ट्रोल करने सुरु केले आहे. यातीलच काही मजेशीर ट्विट पाहा…
#KHALI be like:- pic.twitter.com/I867m5Vhhv
— Ragini? (@Sweet_Jalebi) May 31, 2021
2 mins of silence for those who haven’t read a single comment of #KHALI instagram posts. pic.twitter.com/BpHyeZt5fq
— 71st Century (@hrishikesh__j27) May 31, 2021
DROP Your Wish #KHALI #greatkhali pic.twitter.com/2rEFwZh7HQ
— ᦔꪗ᭢ꪖꪑỉᨶ ꫝꪹỉᡶỉƙ (@hr_x_patel) June 1, 2021
Nothing much, just the iPhone 12 Pro looking like an iPhone 12 Mini in #KHALI ‘s hands ?? pic.twitter.com/M5nxCXzHc8
— Sudeep SD (@sudeepsd_) June 1, 2021
आपल्या भव्य अशा उंचीमुळे प्रसिद्ध असणारा खली WWE मधील महत्त्वाच्या रेसलरमध्ये गणला जातो. खलीची उंची 7 फुट 1 इंच इतकी आहे. सध्या खली भारतातच असल्याने तो WWE मध्ये खेळत नाही. खलीने आपली शेवटची मॅच ऑक्टोबर, 2014 मध्ये रूसेव सोबत खेळला होता. त्यानंतर आतापर्यंत खली एकही सामना खेळलेला नाही. WWE शिवाय खलीने प्रसिद्ध रिएलिटी शो बिग बॉसमध्ये देखील काम केले आहे. त्याचसोबत त्याने काही बॉलीवुड फिल्म्समध्येही काम केले आहे.
हे ही वाचा :
वरुण धवन-कोहलीसह Money Heist च्या प्रोफेसरचा फोटो, मुंबई पोलिसांच्या ट्वीटमागे कारण काय?