मृत्यू अटळ आहे. एक ना एक दिवस प्रत्येक जण मरणार आहे. या पृथ्वीवर ज्याने कोणी जन्म घेतला, मग तो माणूस असो किंवा पशू-पक्षी, मृत्यू निश्चित आहे. एखादी व्यक्ती 100 वर्षापेक्षा अधिक जगते, तर काहीजण 20-30 वयातच हे जग सोडून निघून जातात. तुम्ही स्वत:च्या हाताने स्वत:च जीवन संपवून घेण्याबद्दल आतापर्यंत बरच ऐकलं असेल. पण इच्छामृत्यूशी संबंधित प्रकरण फारच कमी ऐकायला मिळतात. याच्याशी संबंधित एक प्रकरण सध्या चर्चेत आहे. ज्यामुळे लोक हैराण झालेत. एका महिलेने वयाच्या 28 व्या वर्षी सरकारकडे इच्छामृत्यूची मागणी केलीय.
जोराया टेर बीक या महिलेच नाव आहे. ती नेदरलँडला राहते. सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे ही महिला शरीराने एकदम फिट आणि तंदुरुस्त आहे. तिच्याकडे पैशांची अजिबात कमी नाही. तिचा एक बॉयफ्रेंड सुद्धा आहे. त्याच वय 40 आहे. त्याच तिच्यावर भरपूर प्रेम सुद्धा आहे. मग, अस असताना जोराया टेर बीकने इच्छामृत्यूची मागणी का केलीय?. तुम्ही विचार करत असाल, या महिलेकडे सगळ आहे, तरी तिला इच्छामृत्यू का हवा आहे?. त्यामागे काय कारण आहे ते समजून घेऊया.
शरीर ठणठणीत असूनही डॉक्टरांनी हात टेकले
द मिररच्या रिपोर्टनुसार जोराया गंभीर मानसिक समस्यांनी पीडित आहे. तिने ऑटिज्म, पर्सनॅलिटी डिसऑर्डर आणि डिप्रेशन या आजारांचा सामना केलाय. या आजारांमुळे ती इतकी हैराण झालीय की, तिला हे आयुष्य नकोस झालय. म्हणून तिने इच्छामृत्यूची मागणी केलीय. असं नाहीय की, जोरायाने तिच्या या आजारांवर उपचार घेतले नाहीत. तिने उपचार भरपूर घेतले. पण डॉक्टरांनी सुद्धा हात टेकलेत. या समस्यांवर आम्ही उपचार करु शकत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. हे मानिसक आजार आता जास्त झेलू शकत नाही, म्हणून जोरायाने इच्छा मृत्यू मागितलाय.
Cuestión moral.
Zoraya ter Beek, una holandesa de 28 años físicamente sana, ha decidido poner fin legalmente a su vida debido a su lucha contra la depresión, el autismo y el trastorno límite de la personalidad. Está previsto que sea eutanizada en mayo.
¿Esto es aceptable? pic.twitter.com/gPaNGkTGsh— Medusa (@medusach13) April 3, 2024
मृत्यूच्यावेळी सोबत बॉयफ्रेंड असणार
रिपोर्ट्सनुसार, पुढच्या महिन्यात मे मध्ये तिच्या इच्छेनुसार, तिला घरात सोफ्यावर इच्छा मृत्यू दिला जाईल. यावेळी बॉयफ्रेंडसोबत असेल. जोरायाची इच्छा आहे की, मृत्यूनंतर तिचा मृतदेह दफन करण्याऐवजी त्यावर अग्नि संस्कार करावेत.