मुंबई : बाजारात स्मार्टफोन दाखल होण्यापूर्वी लोकांचे फोन 4-5 वर्ष किंवा त्याहून अधिक वर्ष टिकायचे. त्यातही देशात नोकिया सारख्या कंपनीचा बोलबाला होता. तेव्हा मजबूत आणि टिकाऊ फोन बाजारात उपलब्ध असायचे. परंतु आता तसे चित्र पाहिले नाही. आता खूप कमी लोक असे आहेत, ज्यांचे स्मार्टफोन 3-4 वर्ष टिकतात. (7 Tips for Making Your Cell Phone Last Longer)
साधारणतः कोणताही स्मार्टफोन सुरुवातीची एक-दोन वर्ष बरा चालतो. त्यानंतर हँग होणं, बॅटरी लवकर डिस्चार्ज होणं, डिस्प्ले खराब होणं, कॅमेरा क्वालिटीमध्ये फरक, परफॉर्मन्सवर परिणाम होतो. हल्ली बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्सचं आयुष्य कमी का आहे, याबाबत नंतर सविस्तर माहिती देऊ. आज आम्ही तुम्हाला स्मार्टफोन दीर्घकाळ कसा टिकवता येईल, याबाबत काही टिप्स देणार आहोत.
Tempered Screenguard बसवल्यामुळे स्मार्टफोनची स्क्रीन सुरक्षित राहते, स्क्रॅच पडत नाहीत. आजकाल मोबाईल साठी बॅक साईड स्क्रीन गार्ड सुद्धा येतात, कव्हर बसवले तरी धुळीमुळे मोबाईल ची पाठीमागील बाजू सुद्धा खराब होते. अशावेळी बॅक साईड स्क्रीन गार्ड ने मोबाईल अगदी नव्यासारखा दिसतो आणि भविष्यात कधी मोबाईल एक्सचेंज करायचा झाला तर चांगली किंमत मिळून जाते.
मोबाईलच्या सुरक्षिततेसाटी एखादे चांगल्या दर्जाचे बॅक कव्हर बसवा, मोबाईल पडला तर थोडीफार सुरक्षा राहील.
चार्जिंग करताना नेहमी Original चार्जर आणि Original केबल वापरा. मोबाईल बॅटरीचं चार्जिंग 10 % पेक्षा आणू नका. म्हणजे पूर्ण बॅटरी Drain करून चार्ज करू नका. याने बॅटरी चांगली टिकेल.
अनावश्यक Apps किंवा गेम्स मोबाईलमधून टाकू नका. Free गेम्स मध्ये Virus चा धोका राहतो किंवा मोबाईल स्लो होतो. अनेक गेम्सचा मोबाईलच्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो.
आठवड्यातुन किमान एकदातरी मोबाईल Restart करा, कारण बऱ्याचदा Function प्रॉब्लेम असतील तर ते Restart ने निघून जातात.
मोबाईल Waterproof नसेल तर पावसाळ्यात मोबाईल जपून वापरा, मोबाईल एखाद्या प्लास्टिक Pouch मध्ये ठेवा.
फोनमधील फोटो काही ठराविक दिवसानी तुमच्या कॉम्प्यूटरवर, External हार्ड डिस्कमध्ये, पेन ड्राईव्हमध्ये किंवा क्लाऊड स्टोरेजमध्ये Save करून ठेवत रहा. जेणेकरुन तुमचा मोबाईल फुल्ल स्पीडमध्ये चालेल आणि कधी मोबाईल हरवला तर फोटो जाणार नाहीत.
इतर बातम्या
Google Photos अनलिमिटेड स्टोरेज ऑप्शन बंद, युजर्सकडे आता कोणते पर्याय, फोटो कुठे साठवून ठेवणार?
बोंबला! PUBG खेळण्यासाठी मोबाईल नंबरसह पालकांची परवानगी आवश्यक, गेमर्समध्ये नाराजी
(7 Tips for Making Your Cell Phone Last Longer)