WhatsApp चे नवं अपडेट येणार, प्रोफाईल फोटो आणि कॉलिंग फिचरमध्ये हा होणार मोठा बदल

| Updated on: Jul 29, 2024 | 8:25 PM

व्हॉट्सॲपच्या यूजर्ससाठी नवीन अपडेट लवकरच पाहायला मिळणा आहे. यात युजर्सना व्हॉट्सॲप कॉलींगचा अनुभव आणखी समृद्ध होणार आहे. हे नवे इंटरफेस युजर्सचे लक्ष वेधणार आहे.

WhatsApp चे नवं अपडेट येणार, प्रोफाईल फोटो आणि कॉलिंग फिचरमध्ये हा होणार मोठा बदल
whatsapp new calling update
Follow us on

WhatsApp हे इस्टंट मॅसेजिंग मोबाईल एप आहे. व्हॉट्सअप सतत नवनवीन बदल घडवून युजर्सचा अनुभव समृद्ध करीत असते. या इस्टंट मॅसेजिंग एप्सला सर्व जगात पसंद केले जात आहे.आता या प्लॅटफॉर्मवर iPhone युजर्सना नवीन कॉलिंग इंटरपेस मिळणार आहे. ही माहिती WA Beta Info ने X प्लॅटफॉर्मवर ( जुने नाव Twitter ) एक पोस्ट करुन प्रसारित केली आहे. जर तुम्ही WhatsApp कॉलिंग फिचरचा वापर केला असेल आणि कंटाळला असेल तर आता मेटा कंपनीने नवीन कॉलिंग इंटरफेस रोल आऊट केले आहे. आता कॉलिंग बारमध्ये नवीन बटंस दिसणार आहेत. WhatsApp चे अपकमिंग फिचरला ट्रॅक करणाऱ्या आणि त्याची माहिती देणाऱ्या WA Beta Info ने ही माहिती शेअर केली आहे.

येथे पाहा ट्वीट –

ios युजर्ससाठी जारी केले रोलआऊट

whatsApp ने IOS युजर्ससाठी हे फिचर रोलआऊट केले आहे. हे अपडेट version 24.14.78 व्हर्जन मध्ये पाहायला मिळणार आहे. लवकरच हे अपडेट सर्वसामान्य युजर्सपर्यंत पोहचणार आहे. न्यू इंटरफेसने अनेक लोकांचे लक्ष वेधू शकते आणि सर्वसामान्य युजरना देखील हे फिचर पसंत पडू शकतात. WhatsApp च्या सर्व युजर्सना हे फिचर्स लागलीच नजर येणार नाही. हेअपडेट टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे. त्यानंतर हळूहळू हे व्हर्जन सर्वत्र लागू होणार आहे. यासाठी काही दिवस ते काही आठवडे लागू शकतात. यासाठी तुम्ही व्हाट्सअपचे लेटेस्ट व्हर्जन अपडेट करावे. व्हॉट्सॲपच्या यूजर्ससाठी नवीन अपडेट आले आहे. त्यात Apple iPhone वापरकर्त्यांना एक नवीन कॉलिंग इंटरफेस पहायला मिळणार आहे, जो पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक असणार आहे. यात प्रोफाईल फोटोचा आकार मोठा असेल आणि इतर आयकॉनही मोठ्या आकारात दिसतील.