नवी दिल्ली – जगात पहिल्यांदा असं घडणारं आहे, जिथे शहराचा (new city)विस्तार आडवा नाही तर उभा, (vertical)आकाशाच्या दिशेने होणार आहे. या शहराची लांबी 170 किमी असणार आहे. तर रुंदी 200 मीटर असेल. या शहरात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायला केवळ 20 मिनिटे पुरी होणार आहेत. या ठिकाणी हाय स्पीड ट्रेनही (Speed train)धावणार आहेत. या शहराची उंची 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीर असेल. यात घरावरती घरे असणार आहेत. म्हणजे शहराचा विस्तार आडवा न होता उभ्या दिशेने असेल. जर सगळे काही योजनेप्रमाणे झाले तर 2025 साली हे शहर बांधून तयार असेल. आपल्या पारंपरिक शहरांच्या रचनांना आणि कल्पनांना यातून छेद मिळणार आहे. लोकसंख्यावाढीचा विचार करता आगामी काळात अशी शहरे जास्त महत्त्वाची आणि पथदर्शी ठरु शकतील. परग्रहावर तेही चंद्र आणि मंगळावर जाऊन वसाहती उभारण्यापेक्षा, या पृथ्वीतलावर अशी उभी शहरे विकसीत केल्यास आगामी काळात लोकसंख्या आणि पुढच्या पिढीला त्याचा नक्कीच फायदा होईल असा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी करीत आहेत.
? بتصميم يتبنى أروع ما يمكن تخيُّله من إبداعات نخبة العقول المعمارية حول العالم، تمتد مدينة “ذا لاين” المليونية على طول 170 كم.
हे सुद्धा वाचाثورة الحياة الحضرية، ومدينة فيها إبداعات تُثري العالم.
#ذا_لاين #نيوم pic.twitter.com/tj9Hxbue9L
— NEOM (@NEOM) July 25, 2022
या शहराचे नावही ठरवण्यात आले आहे. द लाईन या नावाने हे शहर ओळखण्यात येईल. हे जगातील पहिले व्हर्टिकल शहर असेल. या शहरात ऑफिसेस, घरे, शाळा, उद्यान सगळे काही उभ्या दिशेने असेल. साऊदी अरबचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिल सलमान यांनी या प्रोजेक्टचे संकेत पहिल्यांदा जानेवारी २०२१ मध्ये दिले होते. हे शहर उभे करण्यासाठी ५०० अब्ज डॉलर्स म्हणजे ३९.९५ लाख कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
Perfectly designed for its residents, THE LINE is a city that will change everything about how people live, work and play ?#TheLINE #NEOM pic.twitter.com/132IYH92qI
— NEOM (@NEOM) July 29, 2022
द लाईन हे शहर काचेच्या अर्धा किलोमीटर उंच भिंतींनी झाकलेले असेल. हे शहर १०० टक्के अपारंपरिक ऊर्जेवर चालेल. सौरऊर्जा, वायूऊर्जेचा वापर करण्यात येईल. या शहरात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. त्यामुळे कार्बन उत्सर्जनही नसेल. या शहरात १७० किमी अंतरात ९० लाख लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
आपल्या पारंपरिक इमारतींनी पसरलेल्या शहराच्या तुलनेत हे शहर उभ्या दिशेने विस्तारलेले असले. थोडक्यात उभे शहर असेल. या शहरात रस्ते नसतील, कार नसतील, त्यामुळे वायूंचे उत्सर्जन होणार नाही. या शहराजवळ हायटेक झोनही विकसीत करण्यात येणार आहे. याचा एकूण विस्तार २६,५०० वर्ग किलोमीटर इतका असेल. यातून या शहाराला पूर्ण सहयोग देण्यात येईल.