WhatsApp व्हिडिओ कॉल दरम्यान लूटा अशी पण मजा, आले हे फीचर

| Updated on: Dec 24, 2023 | 2:15 PM

WhatsApp Video | मेटा ही व्हॉट्सअपची पालक कंपनी आहे. Whatsapp ने युझर्ससाठी नवीन फीचर आणले आहे. सोशल ॲप सातत्याने नवनवीन फीचर आणते. त्याचा युझर्सला फायदा होतो. अशात अनेक फीचर अपडेट करण्यात आले आहे. व्हॉट्सअप आता केवळ मॅसेजिंग, चॅटिंग ॲप राहिले नाही. तर त्यात आता हे नवीन फीचर ॲड झाले आहे.

WhatsApp व्हिडिओ कॉल दरम्यान लूटा अशी पण मजा, आले हे फीचर
Follow us on

नवी दिल्ली | 24 डिसेंबर 2023 : इस्टंट मॅसेजिंग ॲप व्हॉट्सॲप आता मोबाईलच नाही तर आयुष्यातील महत्वाचा भाग झाले आहे. कुटुंब, मित्रपरिवार असो की कार्यालयीन काम, प्रत्येक ठिकाणी व्हॉट्सॲपचा उपयोग सहज होत आहे. जगाशी, एकमेकांशी संपर्क साधण्याचे हा महत्वपूर्ण प्लॅटफॉर्म ठरला आहे. युझर्सचा अनुभव अजून समृद्ध व्हावा यासाठी हा प्लॅटफॉर्म युझर्स फ्रेंडली बदल आणतो. या नवीन फीचरमुळे नवीन काहीतरी युनिक सोय होते. तर आता व्हिडिओ कॉलिंगसंबंधीचे एक नवीन अपडेट समोर आले आहे. त्यानुसार, युझर्स व्हिडिओ कॉल दरम्यान म्युझिक ऑडिओ शेअर करु शकतो. त्यामुळे व्हिडिओ कॉलदरम्यान तुम्हाला या ऑडिओवर थिरकता सुद्धा येणार आहे.

मल्टिमीडियाचा वापर वाढणार

WhatApp च्या नवीन फीचरविषयी अपडेट समोर येत आहे. याविषयीची माहिती देणारी वेबसाईट डब्ल्यूएबीटाइंफोने (WABetaInfo) याविषयीचा एक अहवाल समोर आणला आहे. त्यानुसार, iOS आणि Android दोन्ही ठिकाणी ही सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी या फीचरचा विकास करण्यात येत आहे. वृत्त संस्था IANS ने दिलेल्या माहितीनुसार, या सुविधेमुळे युझर्सला व्हिडिओ कॉल सुरु असताना व्हिडिओ आणि म्युझिक ऑडिओ शेअर करण्यासह ऐकण्याची सुविधा देण्यात येणार आहे. यामुळे मल्टिमीडियाचा वापर वाढणार आहे.

हे सुद्धा वाचा

नवीनतेसाठी आणखी एक पाऊल

रिपोर्टमध्ये दावा केल्यानुसार, हे नवीन फीचर या दृष्टीने आणखी एक पाऊल म्हणावे लागेल. नवीन व्हिडिओ कॉल सुविधेमुळे युझर्सचा अनुभव समृद्ध होईल. मॅसेजिंग आणि कम्युनिकेशन ॲप्सवर व्हॉट्सॲपकडून देण्यात येणारी ही मोठी सुविधा म्हणता येईल, असे अहवालात म्हटले आहे.

इमोजी फीचरमध्ये नवीन बदल

ही अपडेट समोर येत असतानाच आता व्हॉट्सॲप काही बीटा टेस्टर्ससाठी एक नवीन मॅनेज इमोजी रिप्लेसमेंट फीचर घेऊन येत आहे. मायक्रोसॉफ्ट स्टोअर ते विंडोज 2.2350.3.0 अपडेटसाठी नवीनतम व्हॉट्सॲप बीटा इन्स्टॉल करता येईल. हे नवीन अपडेट युझर्सला टेक्स टू इमोजी रिप्लेसमेंट पर्याय डिसबेल करण्याची परवानगी देते. त्यामुळे युझर्सला त्यांच्या मनासारखा बदल करण्याचा पर्याय मिळेल.