AI Death Calculator | एआयचे मृत्यूचं कॅलक्युलेटर! सांगणार कधी होणार मृत्यू

| Updated on: Dec 22, 2023 | 11:22 AM

AI Death Calculator | तुमच्या मृत्यूचे निमंत्रण या दिवशी येणार असे तुम्हाला कोणी सांगू शकते का? मृत्यूची तारीख कोणी सांगू शकतं का? मृत्यूचा सांगावा कधी पण येऊ शकतो. चालता,बोलता, हसता, खेळता कोण कधी जाईल, हे सांगता येत नाही. पण विद्यापीठातील संशोधक एआय टूल्सच्या मदतीने मृत्यूचे कॅलक्युलेटर तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.

AI Death Calculator | एआयचे मृत्यूचं कॅलक्युलेटर! सांगणार कधी होणार मृत्यू
Follow us on

नवी दिल्ली | 22 डिसेंबर 2023 : कृत्रिम बुद्धिमत्तेने (Artificial Intelligence) सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. एआयमुळे नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची भीती वाढत आहे. एआयमुळे अनेक कामे लिलया होत आहे. त्यामाध्यमातून व्हिडिओ आणि फोटो सहज तयार करता येते. पण एआयने तुम्हाला मृत्यूची तारीख सांगितली तर? एआय तंत्रज्ञान खरंच असा करिष्मा करु शकते काय? कोणाचा मृत्यू कधी होईल, कोणाला मृत्यूचा सांगावा येईल हे काही सांगता येत नाही. मृत्यू मनुष्याला केव्हापण गाठू शकतो, नाही का? पण AI तंत्रज्ञान तुमचा मृत्यू केव्हा होईल हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी विद्यापीठात मृत्यूचे कॅलक्युलेटर तयार करण्यात येत आहे.

या विद्यापीठाचा दावा काय

तुम्हाला मृत्यूचा सांगावा कधी येणार हे नव उलगडलेलं कोडं आहे. प्रत्येक धर्मात त्याविषयीच्या अनेक दंतकथा आहेत. त्याची काही ठोकताळे आहेत. काही लक्षणं आहेत. अनेक पुस्तकात मृत्यूचा अंदाज कसा ओळखावा याचे काही ठोकताळे दिलेले आहे. पण नेमका मृत्यू कधी होईल हे कोणीच सांगत नाही. यावरच Technical University of Denmark काम करत आहे. त्यासाठी मृत्यूचे कॅलक्युलेटर तयार करण्यात येत आहे. एआय या प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने हा करिष्मा घडणार आहे. लोकांच्या मृत्यूची तारीख त्यांना कळणार आहे. हा प्रयोग सुरु असून त्याचे निकाल अपेक्षेवर खरे उतरण्यात यश आल्याचा दावा करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

ChatGPT चा वापर

याविषयीच्या एका रिपोर्टमध्ये मृत्यू कधी होईल याविषयीचा अंदाज व्यक्त करण्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू नेमका कधी होईल हे माहिती करुन घेण्यासाठी ChatGPT या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी सहाजिकच algorithm चा वापर करण्यात येत आहे. या अल्गोरिदमचे नाव life2vec असे आहे. एआय मॉडेल तुमची कमाई, तुमचा व्यवसाय, नोकरी, तुम्ही कुठे राहता आणि तुमचे एकूणच आरोग्य याचा वापर करुन मृत्यू कधी होईल हे सांगेल. आतापर्यंतचे जे निकाल आहेत. त्यात 78 टक्के निकाल तंतोतत जुळल्याचा दावा करण्यात येत आहे.