मुंबई : भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी भारती एअरटेलने (Airtel) ग्राहकांसाठी नवीन एअरटेल ब्लॅक या ऑल-इन-वन सुविधेची घोषणा केली आहे. सध्या ग्रहकांचे ऑफिस आणि घर एकाच ठिकाणी आहे, म्हणजेच बहुतांश लोकांचे वर्क फ्रॉम होम सुरु आहे. त्यामुळे हाय स्पीड डेटाची आवश्यकता, घरात करमणुकीची गरज आणि मोबाइलवर अनलिमिटेड कनेक्टिव्हिटीची गरज निर्माण झाली आहे. (Airtel Black launches to Let Users Combine Postpaid, DTH, Fibre Services Under One Single Bill)
महिन्याभरात वेगवेगळ्या देय तारखांना देय असणारी बहुविध बिले (Multiple bills due on different due dates throughout the month), रीचार्ज करायला विसरल्यामुळे सेवा बंद पडणे आणि अनेक स्थानिक सेवा प्रदात्यांकडून सेवा व्यवस्थापित करण्यात अडचण निर्माण होणे, यामुळे ग्राहक वैतागले आहेत. त्यामुळेच ग्राहकांच्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी एअरटेलने ‘एअरटेल ब्लॅक’ लाँच केले आहे.
विवेकी गुणवत्ता शोधणार्या ग्राहकांसाठी एअरटेल ब्लॅक हा नवीन कार्यक्रम आहे. ग्राहक एअरटेल ब्लॅकचा वापर करण्यासाठी दोन किंवा अधिक एअरटेल सेवा (फायबर, डीटीएच, मोबाइल) एकत्रित करू शकतो. जो ग्राहकांना एकाच बिलासाठी. रिलेशनशिप मॅनेजर्सची डेडिकेटेड टीम असलेला ग्राहक सेवा क्रमांक आणि तक्रारी सोडवताना प्राधान्य मिळवून देण्यासाठी उपयोगी आहे. एअरटेल ब्लॅकमुळे ग्राहकांना या सेवा इन्स्टॉलेशन शुल्कासह लाईफटाईम फ्री सेवा दिली जाईल.
इतर बातम्या
WhatsApp ला टक्कर, Telegram चे ढासू फीचर्स रोलआऊट, एकाच वेळी 30 जणांना व्हिडीओ कॉल करा
व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शुभेच्छा संदेश पाठवणाऱ्या मेंबर्सना अॅडमिनचा दणका, 10 हजारांचा दंड वसूल!
PUBG Mobile मध्ये Tesla च्या गाड्या दिसणार, कंपनीकडून मोठ्या भागीदारीची घोषणा
(Airtel Black launches to Let Users Combine Postpaid, DTH, Fibre Services Under One Single Bill)