गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंकडे नवी जबाबदारी, पगारात 200 टक्क्यांनी वाढ, महिन्याचा पगार किती?

| Updated on: Dec 22, 2019 | 10:04 PM

मूळचे भारतीय वंशाचे असणाऱ्या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची आर्थिक भरभराट (sundar pichai salary hike) झाली आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंकडे नवी जबाबदारी, पगारात 200 टक्क्यांनी वाढ, महिन्याचा पगार किती?
Follow us on

नवी दिल्ली : मूळचे भारतीय वंशाचे असणाऱ्या गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची आर्थिक भरभराट (sundar pichai salary hike) झाली आहे. गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या सीईओ पदी सुंदर पिचाई यांची नियुक्ती झाली आहे. या नव्या जबाबदारीसाठी पिचाईंना मोठे पॅकेज देण्यात आले (sundar pichai salary hike) आहे.

पिचाई यांना पुढील तीन वर्षांसाठी जवळपास 24.2 कोटी डॉलर म्हणजेच 1720 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. यात दर वर्षाला 20 लाख डॉलर (14 कोटी 2 लाख रुपये) बेसिक सॅलरी आणि 24 कोटी डॉलर (1704 कोटी रुपये) शेअरचा समावेश आहे. येत्या 1 जानेवारीपासून पिचाईंना हा नवा पगार मिळणार आहे.

दरम्यान 24 कोटी डॉलरमधील 12 कोटी डॉलर हे स्टॉक अवॉर्ड द्वारे मिळणार आहे. तर उर्वरित इतर रक्कम ही परफॉर्मन्स बेस्ड असणार आहे. म्हणजे जर पिचाईंनी दिलेले टार्गेट पूर्ण केले तर त्यांना तीन वर्षात शेअर मिळतील. यानुसार पिचाईंना दर महिन्याला 143 कोटी रुपये पगार मिळणार (sundar pichai salary hike) आहे.

गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या सीईओ पदी सुंदर पिचाई यांची नियुक्ती 4 डिसेंबर रोजी करण्यात आली होती. यापूर्वी 2018 मध्ये पिचाईंना जवळपास 19 लाख डॉलर ( 135 कोटी रुपये) पगार मिळत होता. यात 6.5 लाख डॉलर (4 कोटी 6 लाख रुपये) बेसिक सॅलरी होती.

नव्या पॅकेजनुसार पिचाईंच्या पगारात 200 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोणत्याही सर्च इंजिन कंपनीच्या अधिकाऱ्या देण्यात आलेले हे सर्वात मोठे पॅकेज आहे. जर त्यांनी पुढील सर्व टार्गेट पूर्ण केले तर त्यांनी तीन वर्षांसाठी हे पॅकेज दिलं जाणार (sundar pichai salary hike) आहे.

सुंदर पिचाई हे गेल्या 15 वर्षांपासून गुगलमध्ये काम करत आहेत. त्यांनी एका साधारण कर्मचारीपासून गुगलच्या क्रोम ब्राऊजर, अँड्राईड टीमचे लीडर म्हणूनही काम केले आहे. तसेच जीमेल, अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टमवरही त्यांनी काम केले आहे.

गुगलचे सीईओ पदाची ऑफर मिळण्यापूर्वी त्यांना मायक्रोसॉफ्टचे सीईओ पदाची ऑफर मिळाली होती. तसेच याहू आणि ट्विटरकडून त्यांना विविध ऑफर मिळाल्या होत्या. त्यावेळी पिचाईंना गुगल सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांच्या पत्नी अंजली यांनी त्यांना गुगल न सोडण्याचा सल्ला दिला. पत्नीच्या या सल्ल्यामुळे पिचाई हे गुगलमध्ये काम (sundar pichai salary hike) केलं.