7 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच झाला ‘हा’ फोन, काय काय आहेत फीचर्स ?

| Updated on: Dec 16, 2024 | 4:09 PM

लाव्हा कंपनीने त्यांचा नवा एंट्री लेव्हल स्मार्टफोन Lava O3 Pro भारतात लाँच केला आहे. याची किंमत ७ हजारांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड १४ वर काम करतो, जो लेटेस्ट युजर इंटरफेस आणि फीचर्स देतो.

7 हजारांपेक्षा कमी किंमतीत लाँच झाला हा फोन, काय काय आहेत फीचर्स ?
Lava O3 Pro
Image Credit source: social media
Follow us on

भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन लाँच होत असतात. नव्या वर्षात नवा फोन घेण्याची इच्छा बऱ्याच लोकांची असते.    तुम्हीदेखील येत्या नवीन वर्षात नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करताय का ? पण बजेटची चिंता सतावत्ये ? फिकर नॉट.. कारण आता भारतीय स्मार्टफोन ब्रँड लाव्हा कंपनीने त्यांचा धमाकेदार असा, नवा एंट्री लेव्हल स्मार्टफोन Lava O3 Pro लाँच केला आहे. हा स्मार्टफोन सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या किंमतीत आणि उत्तम फीचर्ससह सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा फोन 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि UniSoC प्रोसेसर सारख्या प्रीमियम फीचर्ससह लाँच करण्यात आलेला आहे. चला जाणून घेऊया, या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमतीबद्दल.

Lava O3 Pro किंमत

लाव्हा कंपनीने हा फोन 4GB RAM आणि 128GB जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे. तर कंपनीच्या या फोनची  भारतातली किंमत याची 6,999 रुपये इतकी आहे. Lava O3 Pro हा स्मार्टफोन तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवरून देखील खरेदी करू शकता. ग्लॉसी ब्लॅक, ग्लॉसी पर्पल आणि ग्लॉसी व्हाईट या तीन आकर्षक कलर ऑप्शनमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

Lava O3 Pro स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Lava O3 Pro मध्ये 6.56 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला असून जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात सेंटर पंच-होल कटआऊट देण्यात आले आहे, ज्यामुळे या स्मार्टफोनचा लूक प्रीमियम दिसत आहे.

Lava O3 Pro हा स्मार्टफोन UniSoC T606 प्रोसेसरवर चालतो, जो सामान्य वापर आणि मल्टीटास्किंग दोन्हीसाठी चांगला आहे. फोनमध्ये 4GB RAM रॅम आणि128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे, जे मायक्रो SD कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते.

ऑपरेटिंग सिस्टीम आणि कॅमेरा सेटअप

Lava O3 Pro हा फोन अँड्रॉइड १४ वर काम करतो, जो लेटेस्ट युजर इंटरफेस आणि फीचर्स देणार आहे. Lava O3 Pro मध्ये उत्तम ड्युअल रियर कॅमेरा सेटअपही देण्यात आलेला आहे. यात AI लेन्स फीचरसह 50MP मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनच्या फ्रंटमध्ये 8MP मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे,ज्यात तुम्ही उच्च दर्जाचे सेल्फी आणि व्हिडिओ काढू शकता.

बॅटरी आणि चार्जिंग

फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी दिवसभराचा बॅकअप देऊ शकते. हा स्मार्टफोन 10W वॉट चार्जिंगला सपोर्ट करतो आणि चार्जर बॉक्ससोबत मिळणार आहे.

कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षा

Lava O3 Proमध्ये 4Gसपोर्ट, टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि 3.5mm ऑडिओ जॅक आहे. सिक्युरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलेला आहे.