मुंबई : अमेझॉन इंडियाने (Amazon India) स्मार्टफोन अपग्रेड डेज सेलची (Smartphone Upgrade Days sale) घोषणा केली आहे, ज्याअंतर्गत ग्राहक अनेक फोनवर डील आणि ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. ई-कॉमर्स वेबसाइटने OnePlus, Xiaomi, Samsung, Apple, Vivo आणि Oppo च्या फोनवर सूट जाहीर केली आहे. (Amazon Smartphone Upgrade Days sale, up to 7000 Rs discount on OnePlus, Xiaomi, Oppo smartphones)
नियमित डील्सव्यतिरिक्त अमेझॉनने नवीन OnePlus Nord CE 5G, Redmi Note 10S आणि Tecno Spark 7T सारख्या इतर काही स्मार्टफोन्सवर बँक ऑफर्स सादर केल्या आहेत. स्मार्टफोन अपग्रेड डेज सेलअंतर्गत सुरु झालेली विक्री 8 जुलै 2021 पर्यंत लाईव्ह असेल. विक्रीदरम्यान ग्राहक एसबीआय क्रेडिट कार्डवर 10 टक्के त्वरित सवलत मिळवू शकतात.
बँक ऑफरअंतर्गत एसबीआय क्रेडिट कार्ड वापरणा्ऱ्यांना एसबीआय क्रेडिट कार्ड किंवा ईएमआय पेमेंट वापरण्यावर आयफोन 12 वर इन्स्टंट सूट म्हणून 1,250 रुपयांपर्यंतची सवलत मिळेल. विक्रीदरम्यान काही हायलाइट डील्समध्ये आयफोन 12 चा समावेश आहे जो 9,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह उपलब्ध आहे. हा फोन ग्राहक 70,900 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. ग्राहक एसबीआय क्रेडिट कार्ड ऑफरसह 750 रुपयांच्या फ्लॅट डिस्काऊंटचादेखील लाभ घेऊ शकतात. त्यामुळे हा फोन ग्राहक 70,150 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात.
इतर बातम्या
फेसबुक, ट्विटर आणि गुगलने या देशाला दिली धमकी; जाणून घ्या कारण
अखेर Twitter नमलं, नवे तक्रार अधिकारी नेमणार, दिल्ली हायकोर्टात माहिती
(Amazon Smartphone Upgrade Days sale, up to 7000 Rs discount on OnePlus, Xiaomi, Oppo smartphones)