मुंबई : फिनटेक प्लॅटफॉर्म अँजेल वन लिमिटेडने (अँजेल ब्रोकिंग लिमिटेड) नोव्हेंबर 2021 मध्ये दमदार वाढ साध्य केली आहे. कंपनीच्या ग्राहकवर्गात मागील वर्षाच्या तुलनेत 146.2 टक्के वाढ होऊन कंपनी 7.32 मिलियन्स ग्राहकांपर्यंत विस्तारली आहे. कंपनीच्या एकूण ग्राहक संपादनामध्ये 0.45 मिलियन्स अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत 193 टक्के वाढ झाली. अँजेल वनने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत ग्राहक संख्येत 3.4 मिलियन्सची भर घातली आहे. (Angel One in demand after client base jumps 146 percent)
एआरक्यू प्राइम, स्मार्ट मनी, इन्स्टा ट्रेड आदी आपल्या अत्याधुनिक उत्पादन व सेवांच्या श्रेणीमुळे फिनटेक प्लॅटफॉर्मने वाढीचा दर कायम ठेवला आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये अँजेलने, जेनझेड आणि मिलेनिअल्सना भांडवली बाजाराच्या घोडदौडीकडे आकर्षित करून घेण्यासाठी, स्मार्ट सौदा 2.0 आणि शगुन के शेअर्स, या मोहिमा सुरू केल्या. प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या स्मार्ट सोल्युशन्सबद्दल जागरूकता निर्माण करणे हे या अभियानांचे लक्ष्य आहे.
कंपनीने व्यवसायाच्या सर्वच मापदंडांवर दमदार वाढ साध्य केली. नोव्हेंबर 2021 मध्ये कंपनीची सरासरी दैनंदिन उलाढाल (एडीटीओ) मागील वर्षाच्या तुलनेत 219.3 टक्क्यांनी वाढून 7,217 अब्ज रुपयांवर पोहोचली. याच महिन्यात अॅव्हरेज क्लाएंट फंडिंग बूकमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत 190.9 टक्के वाढ होऊन ते 15.49 अब्ज रुपयांवर गेले, तर ऑर्डर्सची संख्या मागील वर्षाच्या तुलनेत 117.5 टक्के वाढून 57.22 मिलियनस झाली.
अँजेल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी म्हणाले की, “गेल्या काही महिन्यात ग्राहक संपादनात आम्ही सातत्याने वाढ करत आहोत, याचा आम्हाला आनंद वाटतो. याचा अर्थ आम्ही नवीन युगातील गुंतवणूकदारांना योग्य तो प्लॅटफॉर्म आणि सोल्युशन्स देऊ करत आहोत. देशभरातील गुंतवणूकदारांना अखंडित अनुभव सातत्याने देत राहण्याचे उद्दिष्ट आमच्यापुढे आहे. आमच्या नोव्हेंबर महिन्यातील दोन्ही अभियाने यशस्वी ठरली आहेत, असे व्यवसायातील वाढीच्या आकड्यांवरून दिसत आहे.”
अँजेल वन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण गंगाधर म्हणाले, “अँजेल वनमध्ये आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंग यांसारख्या तंत्रज्ञानांचे एकात्मीकरण केले आहे. नवोन्मेष आणि तंत्रज्ञान यांच्या जोरावर आमची कंपनी महिन्यागणिक उत्तम निष्पत्ती साध्य करत आहे. नवीन प्रदेशांमध्ये विस्तार करण्यासाठी तसेच अधिकाधिक वापरकर्त्यांपर्यंत गुंतवणुकीचे लाभ पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”
इतर बातम्या
iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन
Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
(Angel One in demand after client base jumps 146 percent)