मुंबई : नुकतीच आयफोन 14 (iPhone 14) सिरीज लाँच झाली आहे, एकीकडे ॲप्पलने (Apple) आपला आयफोन (iPhone 13) आणि iPhone 12 यांना बजेट फोन करण्यासाठी त्यांच्या किमतीत नुकतीच कपात केली आहे तर दुसरीकडे कंपनीने आपल्या सर्वात स्वस्त 5G फोनची किंमत वाढवली आहे. ॲप्पलने iPhone SE 2022 च्या बेस मॉडेलची किंमत 6 हजार रुपयांनी वाढवली आहे. आयफोन SE 2022 भारतात कोणत्या किमतीत लॉन्च झाला आणि आता किंमत वाढल्यानंतर या मॉडेलची नवीन किंमत काय आहे, याची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
iPhone SE 2022 च्या 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 43,900 रुपये होती, परंतु आता 6,000 रुपयांनी किंमत वाढवल्यानंतर, हे मॉडेल 49,900 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. iPhone SE 2022 चा 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 48,900 रुपयांना लॉन्च करण्यात आला होता, परंतु 6,000 रुपयांच्या वाढीनंतर तुम्ही आता हे मॉडेल 54,900 रुपयांना खरेदी करू शकाल. iPhone SE 2022 चे 256 जीबी मॉडेल आधी 58,900 रुपयांना विकले जात होते, आता किंमत 6 हजारांनी वाढल्यानंतर हे मॉडेल खरेदी करण्यासाठी ग्राहकांना 64,900 रुपये मोजावे लागणार आहेत. तिन्ही मॉडेल्स Apple च्या अधिकृत साइटवर नवीन किंमतींसह लिस्टींग करण्यात आले आहेत.
iPhone SE 2022 च्या स्पेसिफिकेशन्सबाबत बोलायचे झाल्यास, फोनमध्ये 4.7 इंचाचा एचडी डिस्प्ले असून तो 750 x 1334 पिक्सेल रिझोल्यूशन देतो, या फोनमध्ये HDR10 सपोर्ट उपलब्ध आहे. किंमत वाढविण्यात आली असली तरी कंपनीन या फोनमध्ये फार टेक्निकल बदल केलेले नाहीत. फोनची संपूर्ण माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.