मुंबई : मोबाईल (Mobile) हा आयुष्यातील महत्त्वाचा भाग झाला आहे. बाजारात वेगवेगळ्या कंपनीचे फोन आहेत. अगदी लाखांच्या घरात मोबाईल फोनची किंमत आहे. त्याचबरोबर स्मार्टफोन आजची गरज बनली आहे. कोरोना काळापासून वर्क फ्रॉम होम सुरु झालं. आज अनेक गोष्टी घरबसल्या ऑनलाईन करता येत आहे. अशावेळी स्मार्टफोन ही आपली गरज बनली आहे. वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्ट फोन (Smartphone) बाजारात असल्याने स्पर्धाही खूप वाढली आहे. स्मार्टफोनमध्ये असलेल्या सुविधा या खास करुन तरुण पिढीला आकर्षित करतात. आज फोटो काढण्यासाठी कॅमेऱ्याची गरज नाही. स्मार्टफोनद्वारे बेस्ट फोटो काढता येतात. आपल्याकडे जगातील बेस्ट आणि लेटेस्ट मॉडलचा स्मार्ट फोन असावा असं अनेकांना वाटतं. असे युजर्स आयफोन (iPhone) घेण्याचा विचार करतात. त्यामुळे अशा iPhone प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.
जर तुम्ही iPhone प्रेमी आहात. तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. iPhone ने आपला लेटेस्ट मॉडल iPhone13 वर बंपर ऑफर दिली आहे. तुमचं iPhone13 घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होऊ शकतं. इंडिया iStore ने iPhone प्रेमींना आकर्षित करण्यासाठी iPhone13 वर ऑफर दिली आहे. भारतात iPhone13 हा सप्टेंबर 2021 मध्ये लॉन्च झाला. iPhone13 सिरीजमध्ये iPhone13, iPhone13 Pro, iPhone13 Pro Max उपलब्ध आहेत. तर Apple सप्टेंबर 2022 मध्ये iPhone14 सादर करणार आहे. पण त्याच्या लॉन्चबाबत अजून कुठलीच घोषणा करण्यात आली नाही.
128GB व्हेरिएंटची असलेल्या iPhone13ची किंमत 79,900 हजार आहे. पण iStore मध्ये iPhone13 50,900 हजारात मिळणार आहे. शिवाय इंडिया iStore ने iPhone13 वर 5 हजारचा फ्लॅट स्टोअर डिस्काउंट आणि 6 हजार रुपये कॅशबॅक बंपर ऑफरदेखील दिली आहे. कॅशबॅक ऑफर ICICI बँक डेबिट, क्रेडिट कार्ड, कोटक बँक डेबिट, क्रेडिट कार्ड आणि SBI क्रेडिट कार्डांवर आहे.
इंडिया iStore ने आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी आणखी एक ऑफर दिली आहे. तुमच्या जुन्या डिव्हाइसवर एक्सचेंज बोनस ऑफर मिळणार आहे. तुमच्या जुन्या फोनवर 18 हजारांपर्यंत सूट मिळणार आहे. जर तुमच्याकडे iPhone XR, iPhone 11 किंवा iPhone 12 आहे. तर तुम्हाला बंपर ऑफर मिळणार. सर्वात महत्त्वाचं मोबाईलवर असलेली एक्सचेंज ऑफर ही तुमच्या मोबाईलच्या कंडीशनवर अवलंबून आहे.
iPhone 13 128GB ची मूळ किंमत 79,900 रुपये आहे. इंडिया iStore मध्ये या फोनवर 5 हजारची ऑफर आणि 6 हजार कॅशबॅक मिळणार आहे. आणि एक्सचेंज बोनस 18 हजार आहे. या सगळ्या ऑफरनंतर iPhone 13 तुम्हाला 50,900 पर्यंत मिळेल.
1. iPhone 13 256GB – 60,900 रु.
2. iPhone 13 512GB – 80,900 रु.
Aptronixindia, FutureWorld आणि MyImagineStore या स्टोर्समध्येही iPhone 13 वर बंपर ऑफर मिळणार आहे.
इतर बातम्या
Smartphones Under 6000k: किंमत कमी, फीचर्स दमदार, पाहा टॉप 4 स्मार्टफोन्स
Apple M2 चिपसह नवीन MacBook लाँच करणार! जाणून घ्या काय असेल खास
WhatsApp चं नवीन फीचर, डॉक्यूमेंट्स पाठवताना महत्त्वाचे दस्तऐवज सेफ राहणार