अॅप्पल (Apple) एका नवीन बजेट स्मार्टफोनवर काम करत आहे. या अपकमिंग स्मार्टफोनचे नाव आयफोन एसई 4 (iPhone SE 4) असेल. जुन्या आयफोनच्या तुलनेत यात मोठी स्क्रीन आणि थोडे नवीन डिझाइन पाहायला मिळणार आहेत. त्याचे संभाव्य नाव आयफोन एसई 2023 (iPhone SE 2023) किंवा iPhone SE 4 असेल. टिपस्टर जॉन प्रोसेसरने अपकमिंग बजेट आयफोनची माहिती दिली आहे. रिपोर्ट्सनुसार यामध्ये नवीन जनरेशन प्रोसेसर वापरण्यात येणार आहे. या आयफोनची दाखल होण्याची टाइमलाइन अद्याप सांगण्यात आलेली नाही. जुन्या लीक्सबद्दल बोलायचे झाले तर, iPhone SE 4 2023 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रिपोर्ट्सनुसार, अपकमिंग iPhone 4SE मधून होम बटण वेगळे केले जाऊ शकते. तसेच समोरच्या बाजूला नॉचचा वापर केला जाउ शकतो. या फोनमध्ये फेस आयडीऐवजी फिंगरप्रिंट स्कॅनर उपलब्ध असेल. या व्दारे बायोमेट्रिक पद्धतीने मोबाइल अनलॉक करण्याचे काम अधिक सोपे होणार आहे.
अपकमिंग SE मॉडेलमध्ये मोठी स्क्रीन असेल जुन्या मॉडेल्सबद्दल बोलायचे झाले तर, SE सीरीजच्या iPhone मध्ये 4-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, तर आगामी iPhone मध्ये 6.06 इंचाचा डिस्प्ले आहे. यामध्ये अतिशय स्लिम बेझल्स देखील पाहायला मिळतील. 4 इंची स्क्रीन अनेकांना आकर्षित करेल अशी अपेक्षा आहे.
अपकमिंग SE मॉडेलच्या संभाव्य कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, या आगामी iPhone SE मध्ये, iPhone XR प्रमाणे बॅक पॅनलवर f/1.8 अपर्चरसह 12 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. समोर 7 मेगापिक्सेल कॅमेरा दिला जाईल. ऑगस्टमध्ये Apple आपले काही नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या दरम्यान, कंपनी आयफोन 14 सीरीजवरील पडदा उचलू शकते. यामध्ये प्रो व्हेरिएंटचे दोन मोबाईल लॉन्च केले जाऊ शकतात. या फोन्सबाबत अनेक लीक्स समोर आले आहेत, यावेळी Apple New Bionic चिपसेट देखील दिसेल.