Pune Iphone | दहा मिनिटांत मिळणार घरपोच आयफोन, आजपासून भारतात विक्री सुरु

| Updated on: Sep 22, 2023 | 3:59 PM

Apple iPhone 15 | ॲपलचा आयफोन 15 भारतात २२ सप्टेंबरपासून मिळत आहे. आयफोनच्या प्री-बुकिंगला जोरदार प्रतिसाद मिळाला होता. आता आयफोन फक्त दहा मिनिटांत तुम्हाला घरपोच मिळू शकणार आहे. पुणे, मुंबईत ही सुविधा आहे.

Pune Iphone | दहा मिनिटांत मिळणार घरपोच आयफोन, आजपासून भारतात विक्री सुरु
Follow us on

पुणे | 22 सप्टेंबर 2023 : ॲपलच्या आयफोन 15 ची (Apple iPhone 15) वाट अनेक दिवसांपासून भारतीय मोबाईल प्रेमी पाहत होते. आता भारतातील आयफोनची प्रतिक्षा संपली आहे. भारतात आयफोन 22 सप्टेंबर रोजी लॉन्च झाला आहे. यापूर्वी आयफोनची प्री-बुकींग घेण्यात आली. या बुकींगला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आयफोन iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max या चार मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. पुणे, मुंबई आणि दिल्लीत दहा मिनिटांत आयफोन घरपोच मिळणार आहे.

कसा मिळणार आयफोन घरपोच

झोमॅटो कंपनीने ब्लिंकिटकडून आयफोनची डिलेव्हरी सुरु केली आहे. ही डिलेव्हरी फक्त दहा मिनिटांत करण्यात येणार आहे. पुणे, मुंबई, दिल्लीत ही सुविधा देण्यात येणार आहे. ब्लिंकिटचे सह-संस्थापक आणि सीईओ अल्बिंदर धिंडसा यांनी यासंदर्भात X पूर्वीटे ट्विटवर माहिती दिली आहे. अल्बिंदर धिंडसा यांनी म्हटले आहे की, ”आम्ही या वर्षी युनिकॉर्न एपीआरसोबत भागीदारी केली आहे. यामुळे काही मिनिटांत iPhone 15 घरपोच मिळणार आहे.” मागील वर्षी ब्लिंकिटने युनिकॉर्नसोबत आयफोन 14 च्या डिलिव्हरीसाठी करार केला होता.

हे सुद्धा वाचा

काय आहे किंमत

ॲपलचा आयफोन भारतापेक्षा अमेरिकेत स्वस्त आहे. भारतात आयफोन 15 या बेसिक मॉडलची किंमत 79,900 रुपये आहे. iPhone 15 Plus ची किंमत 84,900 आहे. iPhone 15 Pro हा 128,900 रुपयांना उपलब्ध आहे. तर iPhone 15 Pro Max ची किंमत 1,59,900 ते 1,99,900 रुपयांदरम्यान असेल. HDFC Bank बँकेच्या कार्डवर iPhone 15 सीरीजचा फोन घेतल्यावर 5000 रुपये कॅशबॅक मिळणार आहे. तसेच Cashify मार्फत 6000 एक्सचेंज बोनस मिळणार आहे. विजय सेल्सकडून 24 महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI ची सुविधा दिली आहे.

iPhone चा संबंध भारताच्या इस्त्रोशी

ॲपलचा आयफोनचा संबंध भारतीय अंतराळ संस्थेशी (इस्त्रो) आला आहे. आयफोनमध्ये iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max मध्ये इस्त्रोचे GPS बसवले आहे. प्रथमच आयफोनमध्ये भारतीय जीपीएस प्रणालीचा वापर केला गेला आहे. त्यामुळे भारतीय आयफोन वापरकर्त्याला नकाशा पाहण्यासाठी किंवा नॅव्हिगेशनचा वापर करण्यासाठी भारतीय प्रणाली मिळणार आहे.