Asus ने लाँच केले सहा दमदार लॅपटॉप, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

| Updated on: Aug 25, 2022 | 6:34 PM

असूसकडून कंटेंट क्रिएटर्सना लक्षात घेऊन हे सहाही लॅपटॉप तयार करण्यात आले आहेत. हे लॅपटॉप Asus e-store आणि Asus exclusive store वरून खरेदी केले जाऊ शकतात.

Asus ने लाँच केले सहा दमदार लॅपटॉप, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Follow us on

लॅपटॉप निर्मितीत अग्रेसर असलेल्या असूसने (Asus) भारतात आपले सहा नवीन लॅपटॉप एकाच वेळी लाँच केले आहेत. कंपनीने Asus Zenbook Pro 14 Duo OLED, Zenbook Pro 16X OLED, ProArt StudioBook Pro 16 OLED, ProArt StudioBook 16 OLED, Vivobook Pro 15 OLED आणि Vivobook Pro 16X OLED हे लॅपटॉप (Laptop) नुकतेच लाँच केले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे लॅपटॉप कंटेंट क्रिएटर्सना (Content creators) समोर ठेवून तयार करण्यात आले आहेत. हे लॅपटॉप Asus e-store आणि Asus exclusive store वरून खरेदी केले जाऊ शकतात. या लॅपटॉपची किंमत, स्पेसिफिकेशन आणि फीचर्स याबाबत या लेखातून माहिती घेणार आहोत.

1) Asus Zenbook Pro 14 Duo OLED

हा लॅपटॉप ड्युअल स्क्रीन स्क्रीनपॅड प्लस सेकंडरी टचस्क्रीनसह येतो. यामध्ये इंटेल 12th जेनसह Core i9, i7 आणि i5 प्रोसेसरचा पर्याय आहे. यासह, या लॅपटॉपमध्ये 32 जीबीपर्यंत LPDDR5 रॅम आणि 1 टीबीपर्यंत एसएसडी स्टोरेज मिळते. Asus Zenbook Pro 14 Duo ओएलईडी Nvidia GeForce RTX 3050Ti GPU आणि Asus IceCool Plus कूलिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करते. लॅपटॉपच्या स्क्रीनवर 120Hz, 2.8K रिझोल्यूशन आणि एचडीआर सपोर्टचा रिफ्रेश दर दिसतो. या लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 1 लाख 44 हजार इतकी आहे.

2) Asus Zenbook Pro 16X OLED

या लॅपटॉपमध्ये 4K रिझोल्यूशनसह 16 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले येतो. हा लॅपटॉप 12th Gen Core i9-12900H आणि i7-12700H प्रोसेसर पर्यायांसह Nvidia GeForce RTX 3060 जीपीयूने सुसज्ज आहे. लॅपटॉपमध्ये 32 जीबीपर्यंत LPDDR5 रॅम आहे आणि 1 टीबीपर्यंत एसएसडी स्टोरेज पर्याय आहेत. या लॅपटॉपला Asus Zenbook Pro 14 Duo ओएलईडी सह सर्व पोर्टदेखील मिळतात. या लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 2,49,990 रुपये आहे.

3) Asus ProArt StudioBook Pro 16 OLED

हा लॅपटॉप 12th Gen Intel i9-12900H प्रोसेसर आणि Nvidia RTX A3000 जीपीयू ग्राफिक्स कार्डने सुसज्ज आहे. Asus ProArt StudioBook Pro 16 ओएलईडी 12 जीबी GDDR6 रॅमसह 2 टीबीपर्यंत स्टोरेज पॅक करतो. यात दोन एसएसडी स्लॉटसह 2 टीबी + 2 टीबी स्टोरेज सपोर्ट देखील आहे. लॅपटॉपमध्ये 16-इंचाचा OLED डिस्प्ले आहे.

4) Asus ProArt StudioBook 16 OLED

लॅपटॉपमध्ये 16 इंच ओएलईडी डिस्प्लेसह 12th Gen Intel i9-12900H प्रोसेसर आहे. यासोबतच यामध्ये Intel Core i7-12700H प्रोसेसरचा पर्यायही देण्यात आला आहे. लॅपटॉपला 8 जीबी रॅमसह GeForece RTX 3070Ti GPU ग्राफिक्स कार्ड आणि 6 जीबी रॅमसह Nvidia GeForce RTX 3060 जीपीयूचा पर्याय देखील मिळतो. यामध्येही प्रो व्हेरिएंटप्रमाणे डिस्प्ले आणि पोर्ट्स उपलब्ध आहेत. या लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 1,99,99 रुपये आहे.

5) Asus Vivobook Pro 16X OLED

Asus Vivobook मध्ये 16 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले आहे. यात 12th Gen Intel i9-12900H प्रोसेसर आणि 32 जीबीपर्यंत रॅमचा सपोर्ट आहे. लॅपटॉपचे स्टोरेज 1 टीबी एसएसडीने देखील वाढवता येते. त्याच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, यात फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 140W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट दिला आहे. हा लॅपटॉप 1,59,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येईल.

6) Asus Vivobook Pro 15 OLED

या सिरीजमधील हा सर्वात कमी किमतीचा लॅपटॉप आहे. हे मॉडेल केवळ 89,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी केले जाऊ शकते. या लॅपटॉपमध्ये 15.6 इंच फुलएचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले असून तो 16:9 आस्पेक्ट रेशिओसह येतो. यात 12th Gen Intel Core i7-12650H प्रोसेसर आणि 16 जीबीपर्यंत रॅम आहे. याव्यतिरिक्त, यात फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 140W फास्ट चार्जिंग देखील आहे.