मुंबई : तैवानमधील दिग्गज टेक कंपनी असूसने (Asus) मंगळवारी आपल्या झेनबुक आणि व्हिवोबुक लॅपटॉप सिरीज अंतर्गत नवीन लॅपटॉप लाँच केले आहेत. नवीन झेनबुक 13 OLED (UM325UA) ची किंमत 79,990 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर व्हिवोबुक SS14 (M433), व्हिवोबुक 17 (M712), व्हिवोबुक फ्लिप 14 (TM420), व्हिवोबुक K14/K15 आणि व्हिवोबुक 15 (M515) च्या किंमती अनुक्रमे 65,990 रुपये, 62,990 रुपये, 59,990 रुपये, 58,990 रुपये आणि 54,990 रुपये इतक्या निश्चित करण्यात आल्या आहेत. (Asus launches 6 new laptops under ZENBOOK and VIVOBOOK series, know price and features)
असूस इंडिया मधील ग्राहक आणि गेमिंग पीसीचे व्यवसाय प्रमुख, अर्नोल्ड सू यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “नवीन व्हिवोबुक आणि झेनबुक लॅपटॉपच्या लाँचिंगसह आम्ही युजर्सना नवीन टेक्नोलॉजीसह अधिक सशक्त बनवण्यासाठी आमच्या कक्षा अजून रुंद केल्या आहेत. ज्यामुळे मल्टीटास्किंग अधिक सहज होईल आणि त्यामुळे उत्पादकतादेखील वाढते.
अर्नोल्ड म्हणाले की, “युजर एक्सपीरियन्स हा आमच्या अविष्काराचा नेहमीच मुख्य केंद्र राहिला आहे आणि व्हिवोबुक लेटेस्ट एएमडी रायजन 5000 U सिरीज मोबाईल प्रोसेसरसह सादर केला आहे. जो युजर्सना बेस्ट एक्सपीरियन्स प्रदान करेल. हे लॅपटॉप अशा पद्धतीने डिझाईन केलेत, ज्याद्वारे युजर्सच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील.
झेनबुक 13 UM325 बेस्ट AMD रायजन 5000 यू सिरीज 7 एनएम प्रोसेसर आणि फुल एचडी नॅनोएड्ज ओएलईडी डिस्प्लेसह दैनंदिन वापरासाठीचा पोर्टेबल अल्ट्राबुक आहे. या लॅपटॉपमध्ये 67 Wz बॅटरी देण्यात आली आहे. हा लॅपटॉप एकदा चार्ज झाल्यानंतर 16 तासांपर्यंत तो वापरता येईल इतकी मोठी बॅटरी यामध्ये देण्यात आली आहे.
व्हिवोबुक एस एस14 AMD रायजन 5 5500U मोबाइल प्रोसेसर द्वारे संचालित लॅपटॉप आहे आणि हा लेटेस्ट इंटीग्रेटेड एएमडी रेडिओन ग्राफिक्सवर चालतो.
एआयपीटी तंत्रज्ञान बॅटरीचा संपूर्ण दिवस पुरवठा सुनिश्चित करताना सिस्टमची कार्यक्षमता 40 टक्क्यांपर्यंत वाढविण्यास सक्षम आहे. एवढेच नव्हे तर ही सिस्टिम ओवरहीटिंगपासून (लॅपटॉप खूप जास्त गरम होणे) प्रोटेक्ट करते. हे लॅपटॉप तुम्ही ऑनलाईन चॅनल्सच्या माध्यमातूनदेखील खरेदी करु शकता.
इतर बातम्या
12GB/512GB, 5G कनेक्टिव्हिटीसह Mi 11 सिरीज बाजारात, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स
मोबाईल विक्रीत Samsung ची Apple वर मात, फेब्रुवारीत रेकॉर्डब्रेक विक्री
8GB/256GB, क्वाड कॅमेरासह Poco X3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास
(Asus launches 6 new laptops under ZENBOOK and VIVOBOOK series, know price and features)