मुंबई : चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी असूस (Asus) 12 मे रोजी ASUS Zenfone 8 series चीनमध्ये लाँच करणार आहे. ही एक फ्लॅगशिप सिरीज असेल. यासह कंपनी झेनफोन 8 मिनी स्मार्टफोन देखील लाँच करू शकते. काही वृत्तांमध्ये या फोनला iPhone 12 Mini चं अँड्रॉइड व्हर्जन म्हटलं जात आहे. झेनफोन 8 मिनी (Zenfone 8 Mini) लाँच होण्यापूर्वीच त्यामधील काही फीचर्स लीक झाले आहेत. हे फीचर्स पाहून तुम्हीदेखील म्हणाल की, हा स्मार्टफोन बाजारात iPhone 12 Mini शी स्पर्धा करेल. (Asus Zenfone 8 Mini can compete iPhone 12 Mini, features leaked ahead of launch)
हा फोन लाँच होण्यापूर्वीच टिपस्टर मुकुल शर्मा यांनी झेनफोन 8 मिनीची काही वैशिष्ट्ये उघड केली आहेत. टिपस्टरने म्हटले आहे की, Zenfone 8 Mini मध्ये 5.9 Samsung E4 AMOLED स्क्रीन असेल, जी फुल एचडी + रेझोल्यूशनसह येईल. यासह फोनचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज इतका असेल आणि तो अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह येईल. यासह, या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास व्हिक्टस (Gorilla Glass Victus) प्रोटेक्शन मिळेल आणि त्याचे परिमाण 148 x 68.5 x 8.9 mm आणि वजन 169 ग्रॅम इतकं असेल.
लीक्सनुसार झेनफोन 8 मिनी फ्लॅगशिप क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरने सुसज्ज असेल आणि यात 16 जीबी रॅम व 256 जीबी UFS 3.1 फ्लॅश स्टोरेज देण्यात येईल. या फोनला पॉवर देण्यासाठी, यामध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.
[Exclusive] Here’s the Zenfone 8 “Mini” forya:
5.9-inch Full HD+ Samsung E4 AMOLED, 120Hz, GG Victus, Under-display fingerprint scanner
SD888
148 x 68.5 x 8.9mm
169g
upto 16GB RAM, 256GB UFS 3.1 storage
4000mah, 30W
64MP IMX686 primary
12MP wide angle + Macro
3 mics, OZO audio— Mukul Sharma (@stufflistings) May 7, 2021
फोटोग्राफीसाठी, यात एक ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा Sony IMX686 मुख्य सेन्सर, 12-मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा आणि एक मॅक्रो सेन्सर आहे. यासह, या फोनमध्ये एक सेल्फी कॅमेरा उपलब्ध होईल, जो पॉप अप कॅमेरा असणार नाही. यासह, हा फोन तीन मायक्रोफोन आणि OZO ऑडिओसह येणार असल्याचेही टिपस्टरने म्हटलं आहे.
संबंधित बातम्या
बहुप्रतीक्षित ASUS ZenFone 8 Pro लाँचिंगच्या मार्गावर, कसा असेल नवा स्मार्टफोन?
ZENBOOK, VIVOBOOK सिरीजअंतर्गत Asus चे 6 नवे लॅपटॉप लाँच, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स
Work From Home साठी लॅपटॉप घेताय? मग ‘हे’ 5 स्वस्त आणि दमदार लॅपटॉप्स जरुर पाहा
(Asus Zenfone 8 Mini can compete iPhone 12 Mini, features leaked ahead of launch)