तुमच्या फोनमधून ‘हे’ अॅप्स तात्काळ डिलीट करा, अन्यथा फोनमधून पैसे उडतील
आपल्या स्मार्टफोनमध्ये आपण अनेक अॅप्स इन्स्टॉल करुन ठेवतो. त्यांचा वापरही करतो. परंतु गुगल प्ले स्टोरवर असे काही अॅप्स आहेत जे तुमच्या खासगी माहितीशी छेडछाड करु शकतात, तसेच तुमचं आर्थिक नुकसानही करु शकतात.
-
-
आपल्या स्मार्टफोनमध्ये आपण अनेक अॅप्स इन्स्टॉल करुन ठेवतो. त्यांचा वापरही करतो. परंतु गुगल प्ले स्टोरवर असे काही अॅप्स आहेत जे तुमच्या खासगी माहितीशी छेडछाड करु शकतात, तसेच तुमचं आर्थिक नुकसानही करु शकतात. आम्ही तुम्हाला अशा अॅप्सची माहिती देणार आहोत. जर हे अॅप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर तात्काळ डिलीट करा.
-
-
डिजीटल सिक्युरिटी फर्म Avast ने गुगल प्ले स्टोरवरील असे काही अॅप्स शोधले आहेत जे प्रामुख्याने गेमर्सना टार्गेट करत आहेत.
-
-
Avast ने दिलेल्या माहितीनुसार Fleeceware अॅप्स युजर्सचं आर्थिक नुकसान करतात. युजर्सना मोबाईलमध्ये नव्या skins, स्क्रिन्स, वॉलपेपर्स आणि गेम मॉडिफिकेशनचं अमिष दाखवून फ्रॉड करतात.
-
-
फेसबुकवरील मैत्री पडली महाग, नवी मुंबईत विधवा महिलेला सायबर गुन्हेगारांनी घातला 13 लाखांचा गंडा
-
-
हे अॅप्स युजर्सच्या अकाऊंटमधून सब्सक्रिप्शन चार्जच्या नावाखाली पैसे कापून घेतात. यावेळी युजरला कोणताही मेसेज दिला जात नाही. त्यामुळे युजर त्याच्या नुकसानाबाबत अनभिज्ञ असतो.
-
-
Avast ने जारी केलेली Fleeceware अॅप्सची यादी : 1. Skins, Mods, Maps for Minecraft PE, 2. Skins for Roblox. 3. Live Wallpapers HD & 3D Background, 4. MasterCraft for Minecraft, 5. Master for Minecraft, 6. Boys and Girls Skins, 6. Maps Skins and Mods for Minecraft