Bajaj Freedom 125 CNG Price: तुम्हाला बाईक घ्यायची असेल तर आज आम्ही एक चांगला पर्याय घेऊन आलो आहोत. बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. Bajaj Freedom 125 ही बाईक आणखी स्वस्त झाली आहे. ही गोष्ट तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या. कारण, यामुळे तुम्हाला जगातील पहिली CNG बाईक ‘ Bajaj Freedom 125’ खरेदी करण्याची संधी मिळू शकते. याची किंमत, फीचर्स जाणून घेऊया.
बजाजने यावर्षी जुलैमध्ये जगातील पहिली CNG बाईक ‘Bajaj Freedom 125’ लॉन्च केली होती. ही बाईक 95,000 रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स शोरूम किंमतीत बाजारात लॉन्च करण्यात आली होती. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे मायलेज, कारण CNG आणि पेट्रोलसह ही बाईक एकदा फुल टँकमध्ये 330 किमीचे अंतर कापू शकते. आता Bajaj Freedom 125 ची किंमत कमी केल्याने ही बाईक खरेदी आणखी स्वस्त झाली आहे.
इतर पेट्रोल बाईकच्या तुलनेत 50 टक्के इंधनाची बचत झाल्याचा दावा बजाजने केला आहे. यामुळे इंधनाचा कमी वापर आणि चांगल्या मायलेजसाठी हा परवडणारा पर्याय ठरतो. बजाजने त्याची किंमतही कमी केली आहे, त्यामुळे ती खरेदी करणे आणखी स्वस्त होणार आहे. जाणून घेऊया Bajaj Freedom 125 च्या नव्या किंमतीबद्दल.
Bajaj Freedom 125 CNG बाईकच्या किंमतीत 10,000 रुपयांपर्यंत कपात केली आहे. नवीन वर्षाच्या आधी ही मोठी कपात मानली जाऊ शकते. 95,000 रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत लाँच झाल्यानंतर 5 महिन्यांनंतर ही बाईक 10,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. ही कपात त्याच्या ड्रम आणि ड्रम एलईडी व्हेरियंटला लागू होईल.
5,000 रुपयांच्या कपातीनंतर Bajaj Freedom 125 च्या ड्रम व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 90,000 रुपये करण्यात आली आहे. सर्वात मोठी कपात ड्रम एलईडी व्हेरियंटमध्ये दिसून आली, कारण आता त्याची किंमत 10,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता ड्रम एलईडी व्हेरियंटची नवीन एक्स-शोरूम किंमत 1.05 लाख रुपयांऐवजी 95,000 रुपये आहे.
किंमत कपातीनंतर Bajaj Freedom 125 खरेदी करणे आता अधिक परवडणारे आणि सोपे झाले आहे. सेल सुरू झाल्यापासून बजाजने 35,000 फ्रीडम 125 CNG बाईकची विक्री केली आहे. यात 125 सीसीपेट्रोल इंजिन देण्यात आले असून सीटच्या खाली CNG टँक आहे. 2 किलो CNG टँक आणि 2 लीटर पेट्रोल टँक असलेली ही बाईक चांगले मायलेज देते.
CNG वर याचे मायलेज 102 किमी/किलो आहे, तर पेट्रोलवर ही बाईक 64 किमी/लीटर मायलेज देते. ही बाईक CNG वर 200 किमी आणि पेट्रोलवर 130 किमी पर्यंत धावू शकते.