हल्ली प्रत्येकजण बिल्डींग, घर किंवा दुकानातही सीसीटीव्ही बसवतात. पण लाईट गेली किंवा कॅमेरा बंद पडला आणि त्याचवेळी जर चोर आले तर काय होईल, याचा कधी विचार केलात का? कितीही महागडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले, तरी त्याचा काहीही फायदा होत नाही. आता आम्ही यावर काही पर्याय शोधले आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरा हा आपल्या घराच्या आणि दुकानाच्या सुरक्षिततेसाठी असतो. सीसीटीव्ही कॅमेरा बंद केल्यास फुटेज रेकॉर्ड होणार नाही. अशावेळी एखादा चोर येऊन चोरी करत असेल तर चोरट्यांचा शोध घेणे अवघड होऊ शकते. पण एक पर्याय आहे, त्यानुसार तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा शटडाऊन किंवा वीज नसल्याच्या टेन्शनपासून मुक्त होण्यास मदत होऊ शकते.
घर असो, दुकान असो किंवा कार्यालय, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर आता सामान्य झाला आहे. पण वीज गेली किंवा सीसीटीव्ही कॅमेरा बंद पडला तर काय करायचे? आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, वीज गेली किंवा सीसीटीव्ही कॅमेरा बंद झाला तरी तुमचं घर आणि दुकान सुरक्षित राहिल असा पर्याय बाजारात आहे. बॅटरीवर चालणारा सीसीटीव्ही कॅमेरा हा पर्याय तुमच्यासमोर आहे.
बॅटरीवर चालणारा सीसीटीव्ही कॅमेरा हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. याचा उपयोग कठीण परिस्थितीत चोरट्यांचा शोध घेण्यासाठी होऊ शकतो. बॅटरीवर चालणारे कॅमेरे वायरलेस असतात. हे कॅमेरे लाईटशिवाय काम करतात. हे सहज बसवता येतात. चला तर मग जाणून घेऊया बॅटरीवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षेत कशी मदत करतात, याची माहिती जाणून घेऊया.
बॅटरीवर चालणारे सीसीटीव्ही कॅमेरे सामान्य सीसीटीव्ही कॅमेऱ्याप्रमाणेच काम असतात. पण त्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यांना लाईटची अजिबात गरज भासत नाही. हे कॅमेरे बॅटरीवर चालतात. जर तुमच्या भागात लाईटची समस्या असेल तर तुम्ही हे कॅमेरे नक्कीच बसवू शकता. याचा तुम्हाला निश्चित उपयोग होऊ शकतो.
या कॅमेऱ्यांची बॅटरी काही महिने टिकते. बॅटरीवर चालणाऱ्या काही कॅमेरा सिस्टीममध्ये चार्ज करण्याचा पर्याय असतो, तर काहींमध्ये बॅटरी बदलली जाते. आपण किती वेळ कॅमेरा वापरता, यावर हे अवलंबून असते.
हे कॅमेरे Wi-Fi द्वारे कनेक्ट होतात. त्यामुळे व्हिडीओ रेकॉर्डिंग स्टोअर करण्यासाठी वेगळ्या डिव्हाईसची आवश्यकता नसते. आपण त्यांना क्लाउडवर देखील संग्रहित करू शकता. जर तुम्हाला फुटेज स्थानिक पातळीवर साठवायचे असेल तर तुम्ही रेकॉर्डिंग मायक्रो एसडी कार्डवर सेव्ह करू शकता.