नवी दिल्ली : सध्या कोणत्याही कामासाठी स्पेशल ॲप सहज उपलब्ध आहेत. युझर्सला यामुळे मोठा फायदा होतो. त्यांना अनेक कामे या ॲपच्या माध्यमातून करता येतात. हे ॲप लोण्यासारखे सहज चालतात, त्यामुळे वापरकर्त्यांना त्याचा फायदा होतो. पण ॲपच्या माध्यमातून सायबर भामटे (Cyber Scammers) पण त्यांची पोळी शेकतात. या ॲपच्या माध्यमातून सायबर गुन्हे घडतात. युझर्सची गोपनिय माहिती चोरून त्यांना ब्लॅकमेल करणे अथवा बँक खात्यातील रक्कम चोरीचे अनेक प्रकार घडतात. नकली ॲप (Fake App) अत्यंत धोकादायक असतात. त्याचा मोठा फटका बसतो. मोबाईल हॅक करुन तुमचे गुपितं फोडण्याची धमकी देऊन पैसे उकळण्यात येतात.
अस्सल ॲप
त्यामुळे ॲप डाऊनलोड करताना त्याची खातरजमा करा. अस्सल ॲपचा वापर करता येणे गरजेचे आहे. पण प्रश्न येतो की, खरे आणि खोटे ॲपची ओळख पटणार तरी कशी? तर त्यासाठी मोठी चिंता करण्याची गरज नाही. आता अनेक तंत्रामुळे नकली ॲपची ओळख पटविणे सोपे झाले आहे.
युट्यूब, नेटफ्लिक्स, इन्स्टाग्राममार्फत फेक ॲप
बाजारात युट्यूब, नेटफ्लिक्स, चॅटजीपीटी, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल प्लॅटफॉर्मवरुन फेक ॲपचा सुळसुळाट वाढला आहे. सायबर भामटे, गुन्हेगार हे ॲप विविध चॅनल्स, मॅसेजच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे ॲप पोहचवितात. पहिल्यांदा हे ॲप खोटे असल्याची किचिंत ही शंका येत नाही. जर तुम्हाला खऱ्या-खोट्या ॲपची माहिती हवी असेल तर काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.
अशी पटवा फेक ॲपची ओळख