मुंबई : व्हिवो (Vivo) ने अलीकडेच त्यांच्या Y-सिरीजमध्ये एक नवीन स्मार्टफोन सादर केला आहे, व्हिवो वाय 21 ए (Vivo Y21A) असे या स्मार्टफोनचे नाव आहे. हा फोन त्यांच्या जुन्या लाइनअप Vivo Y20A सिरीजचा सक्सेसर (उत्तराधिकारी) आहे. नवीन Vivo Y-सिरीज फोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ डिस्प्ले, Helio P22 SoC आणि 5,000mAh बॅटरी आहे. हा स्मार्टफोन Vivo च्या अधिकृत वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. मात्र कंपनीने या फोनची किंमत आणि उपलब्धतेची माहिती साइटवर शेअर केलेली नाही. हा फोन अमेझॉन, फ्लिपकार्ट या ई-रिटेल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
Vivo Y21A हा एक स्लिम फोन आहे ज्याच्या बॅक पॅनलवर चौरस आकाराचं कॅमेरा मॉड्यूल आहे. फोन स्टँडर्ड 60Hz रिफ्रेश रेटसह 6.51 इंचाच्या HD+ LCD डिस्प्लेसह येतो. पॅनेलचे रिझोल्यूशन 1,600 x 720 पिक्सेल इतकं आहे आणि याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशो 89 टक्के इतका आहे. फोनमध्ये MediaTek Helio P22 SoC प्रोसेसर आहे. ग्राफिक्ससाठी यात IMG PowerVR GE8320 GPU जोडलेला आहे. याच्या सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन Android 11 OS वर कस्टम Funtouch OS 11.1 स्किन वर चालतो.
फोटोग्राफीसाठी, Vivo Y21A ला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो ज्यामध्ये f/2.2 अपर्चरसह 13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी, यात f/2.0 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन फक्त 4GB/64GB स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. फोनला एक्सटेंडेड रॅम पर्याय मिळतो जो तुम्हाला स्मार्टफोनवर 1GB पर्यंत मोफत इनबिल्ट स्टोरेज वापरून रॅम वाढवण्याची परवानगी देतो. यात इंटर्नल स्टोरेजसाठी डेडीकेटेड मायक्रोएसडी स्लॉट देखील आहे.
नवीन Vivo Y21A 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी पॅक ऑफर करतो. याच्या ऑनबोर्ड सेन्सर्समध्ये एक्सेलेरोमीटर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, प्रॉक्सिमिटी सेन्सर, ई-कंपास आणि व्हर्च्युअल जायरोस्कोप यांचा समावेश आहे. याच्या कनेक्टिव्हिटी पर्यायाबद्दल बोलायचे झाल्यास यात 4G कनेक्टिव्हिटी, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, GPS, BEIDOU, GLONASS आणि GALILEO यांचा समावेश आहे. सेफ्टीसाठी यामध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हा फोन डायमंड ग्लो आणि मिडनाईट ब्लू कलर शेड्समध्ये उपलब्ध असेल.
इतर बातम्या
1 GB इंटरनेटसाठी या देशांमधील नागरिक हजारो रुपये मोजतात, भारत-इस्रायलमध्ये डेटा सर्वात स्वस्त
GB/128GB, ट्रिपल रिअर कॅमेरा Realme चा नवीन फोन बाजारात, आजपासून विक्रीला सुरुवात
पेटीएम पेमेंट्स बँकेची विक्रमी कामगिरी, दर महिन्याला 92.6 कोटी यूपीआय ट्रान्झॅक्शन्सचा टप्पा पार
(Best mileage Scooter with 100CC engine, TVS Jupiter, Hero Pleasure Plus, TVS Scooty Zest)