मोठी बॅटरी आणि शानदार फीचर्स, किंमत 8000 रुपयांहून कमी, पाहा देशातील टॉप 5 स्मार्टफोन्स
आम्ही आज तुम्हाला 8000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहोत. यामध्ये Realme, lava, Infinix आणि Gionee सारख्या कंपन्यांच पर्याय आहेत.
1 / 5
Realme Narzo 50i हा रियलमीचा फोन Flipkart वरून 7499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या किंमतीत 2 GB रॅम आणि 32 GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. यात 6.5 इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच यात 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. तसेच यात ऑक्टा-कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो.
2 / 5
GIONEE Max Pro हा Gionee चा स्मार्टफोन Flipkart वरुन 7299 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तसेच यामध्ये 3 GB रॅम उपलब्ध आहे. या मोबाईलमध्ये 6.52 इंचांचा एचडी प्लस डिस्प्ले आणि 6000mAh क्षमतेची बॅटरी आहे. याच्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यात 13 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा आहे.
3 / 5
Infinix Smart 5 हा स्मार्टफोन Flipkart वरून 7499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या किंमतीत 2 GB रॅम आणि 32 GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. कंपनीने यामध्ये 6.82 इंचांचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याच्या बॅक पॅनलवर डुअल कॅमेरा आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे, तर फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. तसेच यात 6000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे.
4 / 5
LAVA Z66 हा लाव्हा कंपनीचा फोन फ्लिपकार्ट वरून 7,777 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. यामध्ये 3 जीबी रॅम आहे. तसेच, या फोनमध्ये 6.08 इंचांचा डिस्प्ले आहे. कंपनीने याच्या बॅक पॅनलवर डुअल कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि सेकंडरी कॅमेरा 5 मेगापिक्सलचा आहे. यात 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.
5 / 5
Vivo Y15A स्मार्टफोन नुकताच लाँच झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, यात Helio P35 प्रोसेसर, वॉटरड्रॉप नॉच आणि बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सध्या कंपनीने हा मोबाईल फोन फिलिपिन्समध्ये लॉन्च केला आहे. Vivo Y15S (2021) मध्ये देखील अशीच वैशिष्ट्ये आहेत. Vivo Y15A (2021) ची किंमत PHP 7,999 (जवळपास 11,895 रुपये) आहे.