Phone under 10000: 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतले टॉप 7 स्मार्टफोन, लिस्टमध्ये Samsung, MI, Realme चे पर्याय

| Updated on: Apr 06, 2022 | 11:50 AM

Phone under 10000: भारतीय स्मार्टफोन बाजारात शाओमी (Xiaomi) पासून सॅमसंगपर्यंत (Samsung) पर्यंत अनेक ब्रँड उपलब्ध आहेत. वनप्लस (Oneplus) आणि iPhone वगळता प्रत्येक ब्रँड भारतीय बाजारात बजेट स्मार्टफोन विकतो.

Phone under 10000: 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतले टॉप 7 स्मार्टफोन, लिस्टमध्ये Samsung, MI, Realme चे पर्याय
Follow us on

Phone under 10000: भारतीय स्मार्टफोन बाजारात शाओमी (Xiaomi) पासून सॅमसंगपर्यंत (Samsung) पर्यंत अनेक ब्रँड उपलब्ध आहेत. वनप्लस (Oneplus) आणि iPhone वगळता प्रत्येक ब्रँड भारतीय बाजारात बजेट स्मार्टफोन विकतो. 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत आपल्याकडे अनेक उत्तमोत्तम स्मार्टफोन्सचे पर्याय आहेत. हे स्मार्टफोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन (Amazon) आणि फ्लिपकार्ट (Flipkart) वरुन खरेदी करता येतील. यामध्ये मोठा बॅटरी बॅकअप, किमान 4 जीबीपर्यंतचा रॅम आणि अनेक चांगले फीचर्स या मोबाईलमध्ये पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत. या यादीत Poco C31, Realme Narzo 50i, Redmi 9i, Samsung Galaxy M02, Samsung Galaxy F02s, OPPO A12, Vivo Y1s या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

  1. Poco C31, किंमत 8999 रुपये: Poco C31 हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे, या फोनची किंमत 8999 रुपये आहे. यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज स्पेस आहे. तसेच, युजर्स यात 512 GB पर्यंतचे SD कार्ड इन्सर्ट करू शकतात. यात 6.53 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा असेल. तसेच यात 5 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
  2. Realme Narzo 50i, किंमत 7549 रुपये: रियलमी नार्झो 50 आय हा स्मार्टफोन Flipkart वरून खरेदी करता येईल. यात 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस आहे. तसेच यामध्ये 256 GB पर्यंत स्टोरेज स्पेस देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळेल. यामध्ये SC 9863A प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे, तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
  3. Redmi 9i, किमत 8799 रुपये: हा Redmi स्मार्टफोन 8799 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस आहे. यात युजर्स 512 GB पर्यंत SD कार्ड जोडता येईल. यात 6.53 इंचाचा डिस्प्ले आहे. फोनच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तर 5 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरादेखील देण्यात आला आहे. या मोबाईलला 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
  4. Samsung Galaxy M02, किंमत 9490 रुपये: Samsung Galaxy M02 ची किंमत 9490 रुपये आहे. यात 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे. तसेच, यात 6.55 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. यात 13 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचा डुअल रियर कॅमेरा आहे. यात 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरादेखील मिळेल. फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
  5. Samsung Galaxy F02s, किंमत 9499 रुपये: Samsung चा F02S देखील 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल. हा फोन 3 GB रॅम आणि 32 GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. यामध्ये 1 TB पर्यंतचे स्टोरेज कार्ड जोडता येईल. यात 6.51 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा आहे, तर फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा आहे.
  6. OPPO A12, किंमत 9,990 रुपये: Oppo चा हा स्मार्टफोन देखील 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. यात 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज स्पेस आहे. यामध्ये युजर्स 256 GB पर्यंतचे SD कार्ड जोडू शकतात. यात 6.22 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. युजर्सना या फोनमध्ये 4230 mAh ची बॅटरी मिळेल.
  7. Vivo Y1s, किंमत 9989 रुपये: 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतला Vivo चा फोनदेखील उत्तम आहे. या फोनमध्ये 6.22 इंचांचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. तसेच यात 5 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेराही दिला आहे. फोनमध्ये 4030 mAh क्षमतेची बॅटरी आहे आणि हा फोन MediaTek P35 प्रोसेसरवर काम करतो.

इतर बातम्या

150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास

Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम

क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स