नवी दिल्ली : लोकप्रिय इन्स्टन्ट मॅसेजिंग एप व्हाट्सअपने मोठी कारवाई करीत भारतात जानेवारी महिन्यात तब्बल 29 लाख खाती बंद करून टाकली आहेत. ही माहिती व्हाट्सअपने आपल्या मासिक रिपोर्टमध्ये दिली आहे. व्हाटसअपच्या गैरवापर होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर कंपनीने आयटी कायद्याच्या नियम 2021 नूसार ही खाती बंद केली आहेत. त्यामुळे 1 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान तब्बल 29 लाख खात्यांवर संपूर्णपणे प्रतिबंध आणण्यात आला आहे.
व्हाटसअपने आपल्या अहवालात म्हटले आहे की जानेवारी महिन्यात 29,18,000 खाती बंद केली असून त्यात 10,38,000 लाख अशी खाती आहेत, ज्यांना सावधानता म्हणून बंद करण्यात आले आहे. आमचा मॅसेजिंग प्लॅटफॉर्म एंड टू एंड एन्क्रिप्टेड मॅसेजिंग सेवेचा दुरूपयोग करणाऱ्या विरोधात कठोर पावले उचलत आहे. आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित मंच मिळावा यासाठी आम्ही ही पावले उचलत आहोत. आमच्या वापरकर्त्यांना सुरक्षित व्यासपीठ मिळावे यासाठी आम्ही अनेक वर्षे आर्टीफिशियल इंटेलिजन्स, लेटेस्ट टेक्नोलॉजीवर लागोपाठ गुंतवणूक करीत आहोत.
आपल्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर रोखण्यासाठी आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी वेगवेगळे टूल्स आणि साधनांचा वापर व्हाटसअप करीत आहे. कोणत्याही खात्याचा गैरउपयोग होत असेल तर त्याचा शोध घेण्याचे तीन पर्याय आहेत. पहिला पर्याय रजिस्ट्रेशनच्या वेळी, संदेश पाठवताना आणि नकारात्मक प्रतिक्रियेला उत्तर देताना आम्हाला युजरकडून रिपोर्ट मिळत असतो.
WhatsApp ही Facebook च्या मालकीची क्रॉस-प्लॅटफॉर्म मेसेजिंग आणि व्हॉईस ओव्हर IP (VoIP) सेवा आहे. जी वापरकर्त्यांना मजकूर संदेश आणि व्हॉइस संदेश पाठविण्यास, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल करण्यास आणि प्रतिमा, दस्तऐवज, वापरकर्ता स्थाने आणि इतर माध्यम उपलब्ध करुन देते. WhatsApp प्रामुख्याने मोबाइल डिव्हाइसवरून चालते. परंतू, ते डेस्कटॉप संगणकावरून देखील वापरता येते. व्हॉट्सअॅप सेवेसाठी वापरकर्त्याने मोबाइल नंबर प्रदान करणे आवश्यक आहे.