मुंबई : वोडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) ने जवळपास सहा कोटींच्या अल्प उत्पन्न ग्राहकांना 49 रुपयांची विनामूल्य योजना जाहीर केली आहे. कोरोनाच्या या कठिण काळात ग्राहकांसाठी ही एक सुविधा वोडाफोन-आयडिया यांच्याकडून जाहिर करण्यात आली आहे. कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, जर ग्राहकाने 79 रुपयांचा प्लान घेतला तर जवळजवळ दुप्पट फायदा यावर ग्राहकाला होणार आहे. (Big news for Vodafone Idea customers now Rs 49 plan will be available for free)
6 कोटी ग्राहकांना याचा फायदा होणार
कंपनीने आपल्या सहा कोटी ग्राहकांसाठी ही योजना जाहीर केली आहे. 49 रुपयांच्या रिचार्ज योजनेसाठी कंपनीला 294 कोटी रुपये खर्च येणार आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘वीआय सध्याच्या कठीण परिस्थितीत आपल्या कमी उत्पन्न असलेल्या सहा कोटी ग्राहकांना 49 रुपयांचे पॅक मोफत देईल.
38 रुपयाचा टॉकटाइम
यामध्ये 38 रूपयांचा टॉकटाइम आणि 100 एमबीचा डेटा देण्यात येणार असून त्याची वैधता 28 दिवसांची असेल. या ऑफरसह, वीआयला आशा आहे की, त्याचे ग्राहक त्याच्याशी कनेक्ट होतील. यापूर्वी, जिओ आणि एअरटेल कंपन्यांनी देखील आपल्या ग्राहकांसाठी अशा खास ऑफर आणल्या होत्या.
जिओने देखील केली घोषणा
देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स जिओनेही अशी विनामूल्य ऑफर जाहीर केली आहे. जियोफोनने 100 रूपयात आपल्या ग्राहकांसाठी ऑल-इन-वन प्रीपेड योजना आणली आहे. या अगोदरही जिओफोनने आपल्या ग्राहकांसाठी एक खास योजना आणली होती. ती म्हणजे एका फोनवर दुसरा फोन फ्री आता या नव्या योजनेत जिओफोनची प्लॅनची वैधता 14 दिवसांची करण्यात आली आहे.
एअरटेलकडूनही ग्राहकांसाठी खास आॅफर
देशातील दुसर्या क्रमांकाची दूरसंचार कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांना एक चांगली ऑफर दिली आहे, ज्यामध्ये कंपनीने कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना 49 रुपयांपासून ते 5.5 कोटींचे रिचार्ज पॅक जाहीर केले आहे. यासह 79 रुपयांच्या पॅकवर दुप्पट फायदा होणार आहे. याचा अर्थ असा की एखाद्या ग्राहकाने 79 रुपयांचा रिचार्ज पॅक घेतल्यास त्याला दुप्पट फायदा होईल. कंपनीने ही ऑफर कोरोना काळात खास आपल्या ग्राहकांसाठी आणली आहे. जेणेकरून ग्राहक कंपनीसी कनेक्ट राहू शकतील.
संबंधित बातम्या :
खुशखबर ! रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलने केली ‘ही’ मोठी घोषणा, ग्राहकांना होणार मोठा फायदा
Airtel आणि Jio ला टक्कर देण्यासाठी BSNL चा नवा प्लॅन, दुप्पट डेटा मिळणार
Jio, Airtel आणि Vi ला टक्कर देण्यासाठी BSNL चा ढासू प्लॅन लाँच
(Big news for Vodafone Idea customers now Rs 49 plan will be available for free)