नवी दिल्ली | 22 नोव्हेंबर 2023 : अखेर OpenAI चं नाक दाबल्यानंतर, कंपनी नाक घासत माजी सीईओ सॅम ऑल्टमन यांच्याकडे आली. सॅम ऑल्टमन यांना ओपनएआयने पाच दिवसांपूर्वी सीईओ पदावरुन हटवले होते. कंपनीचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी पण अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली. त्यानंतर मायक्रोसॉफ्टचे सत्य नडेला यांनी या दोघांना कंपनीत विशेष प्रकल्पासाठी रुजू केल्याची घोषणा केली. तिकडे बडे गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांनी ओपनएआयच्या संचालक मंडळाला जेरीस आणले. त्यामुळे नाक मुठीत घेत संचालक मंडळाने आज सॅम ऑल्टमन यांना पुन्हा सन्मानानं सीईओपद बहाल केल्याची घोषणा केली. कंपनीने सॅम ऑल्टमन यांना काढल्यामुळे गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसल्याचे मान्य केले. आता तरी या नाट्यमय वादावर पडदा पडेल, अशी आशा आहे.
आणि दिली आनंदवार्ता
सॅम ऑल्टमन यांना सीईओपद बहाल करण्यासाठी याविषयीचे करारपत्र केल्याचे ओपनएआयने ट्विटरवर जाहीर केले. याविषयीची सविस्तर माहिती लवकरच समोर येईल, असे कंपनीने सांगितले. आतापर्यंत जी संयम बाळगला त्याबद्दल ओपनएआयने सर्वांचे आभार मानले.
We have reached an agreement in principle for Sam Altman to return to OpenAI as CEO with a new initial board of Bret Taylor (Chair), Larry Summers, and Adam D’Angelo.
We are collaborating to figure out the details. Thank you so much for your patience through this.
— OpenAI (@OpenAI) November 22, 2023
ओपनएआयमध्ये परतण्याचे दिले संकेत
दरम्यान सॅम ऑल्टमन यांनी ओपनएआयमध्ये परतण्याचे संकेत दिले. गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडल्याचे त्यांनी मान्य केले. ओपनएआयमधून बाहेर पडल्यावर मित्र सत्य नडेला यांनी मोलाची साथ दिली. आता पु्न्हा ओपनएआयमध्ये परतत असल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी मायक्रोसॉफ्टसोबत काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
i love openai, and everything i’ve done over the past few days has been in service of keeping this team and its mission together. when i decided to join msft on sun evening, it was clear that was the best path for me and the team. with the new board and w satya’s support, i’m…
— Sam Altman (@sama) November 22, 2023
संचालक मंडळाची माघार का
सॅम ऑल्टमन याला माघारी बोलवण्यासाठी बड्या गुंतवणूकदारांनी ओपनएआयवर दबाव टाकला. संचालक मंडळाला गुंतवणूकदारांचा रागरंग कळून चुकला होता. Thrive Capital आणि Tiger Global Management या बड्या गुंतवणूकदारांनी दबाव टाकला होता. तर कर्मचारी सामुहिक राजीनामे देण्याच्या तयारी होते. मीरा मुराती यांना ऑल्टमन यांच्या जागी हंगामी सीईओपदी वर्णी लावण्यात आली होती. पण रविवारी त्यांना पण या पदावरुन बाजूला करण्यात आले होते. त्या ऑल्टमन यांच्या सहकारी होत्या. त्यामुळे एकूणच ओपनएआयचा डोलारा कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे तातडीने संचालक मंडळाने गुडघे टेकवले.