मुंबई : तुम्ही जर ब्लॅकबेरी (BlackBerry) चे फोन वापरत असाल तर या मोबाईल्सना टाटा-बायबाय करण्याची वेळ आली आहे. कारण ब्लॅकबेरीचे मोबाईल आजपासून काम करणार नाहीत. कंपनीचे जगप्रसिद्ध QWERTY कीपॅडवाले फोन आजपासून चालणार नाहीत. आजपासून तुम्ही या फोनला ओल्ड आणि रिजेक्ट मॉडेल म्हणून पाहू शकता. म्हणजे तुमच्या ब्लॅकबेरी फोनवरून तुमच्या मित्रांना कॉल करण्याचा किंवा एसएमएस पाठवण्याचा प्रयत्न करू नका. कारण आजपासून या मोबाईल्सचं फंक्शनिंग पूर्णपणे बंद होत आहे. (Blackberry phones will stop working from Today, its end of an era of QWERTY keypad mobiles)
ब्लॅकबेरी (BlackBerry) हा सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन ब्रँडपैकी एक आहे. कंपनीने त्यांचे लोकप्रिय QWERTY कीपॅड-BlackBerry OS फोन बनवणे काही वर्षांपूर्वी बंद केले, परंतु डिव्हाइसला सॉफ्टवेअर सपोर्ट होता. तथापि, 2022 च्या सुरूवातीस, ब्लॅकबेरी त्याच्या स्मार्टफोनसाठी सपोर्ट थांबवत आहे. ब्लॅकबेरीने गेल्या आठवड्यात गुरुवारी जाहीर केले की, ते सर्व क्लासिक ब्लॅकबेरी OS आणि ब्लॅकबेरी 10 सपोर्टेड स्मार्टफोनचा सपोर्ट बंद करणार आहेत. जे ग्राहक अजूनही त्याच सॉफ्टवेअरवर सुरु असलेले फोन वापरत आहेत त्यांना कंपनीने सांगितले आहे की, ते 4 जानेवारीपासून सेल्युलर आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटीवर दिलेल्या जाणाऱ्या सेवांना सपोर्ट करु शकणार नाहीत.
याचा अर्थ असा की कॉल, सेल्युलर डेटा, एसएमएस आणि इमरजन्सी कॉल यांसारखी बेसिक कामं तुम्ही आता ब्लॅकबेरी फोनवरुन करु शकणार नाही. येथे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की या बदलामुळे अँड्रॉइडवर चालणाऱ्या ब्लॅकबेरी स्मार्टफोन्सवर कोणताही परिणाम होणार नाही. कंपनीने आजपासून (4 जानेवारी 2022) अधिकृतपणे BlackBerry OS आणि BlackBerry 10 वर चालणाऱ्या स्मार्टफोन्सचा सपोर्ट बंद केला आहे.
“रिमाइंडर म्हणून, BlackBerry 7.1 OS आणि पूर्वीचे BlackBerry 10 सॉफ्टवेअर, BlackBerry PlayBook OS 2.1 आणि पूर्वीच्या व्हर्जनसाठी लेगसी सेवा 4 जानेवारी 2022 नंतर उपलब्ध होणार नाहीत. आजपासून या परंपरागत सेवा आणि वर नमूद केलेल्या सॉफ्टवेअर वर चालणारे डिव्हाईसेस डेटा, फोन कॉल, एसएमएस करण्यासाठी सक्षम नसतील.
तथापि, फेब्रुवारी 2020 मध्ये, TCL ने जाहीर केले की ते यापुढे ब्लॅकबेरी फोनचे उत्पादन करणार नाही. कंपनीचा शेवटचा फोन BlackBerry KEY2 LE हा लॉन्च झाला होता. 2020 मध्ये, टेक्सास-आधारित स्टार्टअप OnwardMobility ने 2021 मध्ये 5G ब्लॅकबेरी फोन लॉन्च करण्यासाठी एक टीझर जारी केला होता. मात्र हे मॉडेल अद्याप समोर आलेले नाही.
इतर बातम्या
OnePlus 10 Pro पुढच्या आठवड्यात बाजारात, लाँचिंगआधीच कॅमेरा डिटेल्स, स्पेसिफिकेशन्स लीक
15 मिनिटांत चार्ज होणारा स्मार्टफोन या आठवड्यात भारतात लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
18000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत एकापेक्षा एक गेमिंग स्मार्टफोन, पाहा टॉप 5 मोबाईल
(Blackberry phones will stop working from Today, its end of an era of QWERTY keypad mobiles)