मुंबई : boAt ने एक नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. boAt Wave Armour Rugged असं या स्मार्टवॉचचं नाव आहे. ज्यामध्ये एक नवीन आणि युनीक अशी डिझाईन देण्यात आली आहे. हे घड्याळ दिसायलाही खूप मजबूत दिसते. महत्त्वाचं म्हणजे त्याची किंमत देखील खूप कमी आहे. चला जाणून घेऊया boAt Wave Armor Rugged Smartwatch ची किंमत आणि वैशिष्ट्ये काय आहेत.
boAt Wave Armor Rugged स्मार्टवॉचमध्ये 240×284 रिझोल्यूशन देण्यात आले आहे. ज्यामध्ये 1.83-इंचचा HD डिस्प्ले आणि 550 nits चा ब्राइटनेस लेव्हल देण्यात आलाय. यामुळे सूर्यप्रकाशातही स्क्रीन व्यवस्थित दिसतेय. या घड्याळामध्ये स्प्लिट-स्क्रीन विजेट देखील आहे, जे युजर्सला एकाच वेळी अनेक फीचर वापरण्यास सक्षम करते.
boAt Wave Armor Rugged स्मार्टवॉचची रचना रफ आहे आणि ती सर्वात कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार केली आहे. यात जस्त मिश्र धातुचे वापरले आहे. ज्यामुळे घड्याळ्याचे नुकसान होण्याची शक्यता कमी आहे. हे घड्याळ IP67-रेट केलेले आहे, याचा अर्थ ते धूळ आणि पाणी प्रतिरोधक आहे. फिटनेस उत्साहींसाठी ते परिपूर्ण आहे.
क्रिकेट आणि हायकिंगसह 20+ स्पोर्ट्स मोड आहेत, जे फिटनेस प्रेमींसाठी आवडीचे ठरते. स्मार्टवॉचची बॅटरी लाइफ प्रभावी आहे, एका चार्जवर 7 दिवसांपर्यंत किंवा ब्लूटूथ कॉलिंगसह 2 दिवस टिकते. याचा अर्थ युजर सतत चार्जिंगची काळजी न करता घड्याळ घालू शकतात. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ आवृत्ती 5.2 आणि ब्लूटूथ कॉलिंग आहे. माइक आणि स्पीकर देण्यात आला आहे. ज्यामुळे युजर्स सहज कॉलिंग फीचर वापरू शकतात.
boAt Wave Armor Rugged स्मार्टवॉच आता फक्त boAt-lifestyle.com आणि Amazon.in वर उपलब्ध आहे. ज्याची किंमत फक्त Rs.1,899 रुपये आहे. अॅक्टिव्ह ब्लॅक आणि ऑलिव्ह ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये ते उपलब्ध आहे.