BSNL कडून जबरदस्त ऑफर, या प्लॅनसोबत 24GB डेटा मिळणार मोफत

| Updated on: Oct 06, 2024 | 6:14 PM

bsnl recharge offers: बीएसएनएल आपल्या युजर्ससाठी वर्षभराच्या रिचार्जपासून सुटका देणारे प्लॅन दिले आहेत. पहिल्या प्लॅन ज्या युजरला खूप जास्त इंटरनेट लागते, त्यांच्यासाठी आहे. 1999 रुपयांचा हा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये युजरला वर्षभर 600 जीबी डाटा मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 एसएमएस हे लाभ आहेत.

BSNL कडून जबरदस्त ऑफर, या प्लॅनसोबत 24GB डेटा मिळणार मोफत
BSNL
Follow us on

मोबाईल फोन प्रत्येकाच्या घरात नाही तर प्रत्येकाच्या हातात झाला आहे. मोबाईल ही गरज बनली आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी सर्वच खासगी कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवले. आयडिया-व्होडाफोन, जिओ आणि एअरटेलकडून दरात वाढ करण्यात आली. या वाढीनंतर अनेक मोबाईल वापरकर्ते पुन्हा सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनलकडे (BSNL) वळले आहे. बीएसएनएलने आता त्यांच्या युजर्ससाठी एक जबरदस्त ऑफर आणली आहे. बीएसएनएल ग्राहकांना मोफत डेटाही देत आहे. बीएसएनएलकडून 24GB डेटा मोफत देण्यात येणार आहे.

असा मिळेल 24GB मोफत 4G डेटा

बीएसएनएलची सुरुवात 15 सप्टेंबर 2000 रोजी झाली होती. कंपनीला आता 24 वर्ष पूर्ण झाले आहे. यामुळे कंपनीकडून 24GB मोफत 4G डेटा देण्यात येत आहे. फक्त 24GB मोफत डेटा मिळवण्यासाठी एक अट असणार आहे. बीएसएनएल ग्राहक 24GB एक्स्ट्रा डेटाचा लाभ मिळवण्यासाठी 500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रिचार्ज करावा लागणार आहे. हे रिचार्ज 1 ते 24 ऑक्टोंबर दरम्यान केल्यावरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

BSNL चा 599 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलचा 599 रुपयांचा प्लॅन आहे. त्यात युजरला रोज 5 जीबी डेटा मिळतो. त्याची व्हॅलिडीटी 84 दिवस आहे. तसेच त्यावर कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग करता येते. रोज 100 SMS पाठवता येतात. विशेष म्हणजे या प्लॅनमध्ये रात्री 12 ते सकाळी 5 पर्यंत अनलिमिटेड मुफ्त डेटा मिळतो. तसेच फ्री कॉलरट्यून आणि Zing अ‍ॅपचे सब्सक्रिप्शन मिळते.

हे सुद्धा वाचा

BSNL चा 1999 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएल आपल्या युजर्ससाठी वर्षभराच्या रिचार्जपासून सुटका देणारे प्लॅन दिले आहेत. पहिल्या प्लॅन ज्या युजरला खूप जास्त इंटरनेट लागते, त्यांच्यासाठी आहे. 1999 रुपयांचा हा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये युजरला वर्षभर 600 जीबी डाटा मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 एसएमएस हे लाभ आहेत.

BSNL चा 2999 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलने वार्षिक वापरकर्त्यांसाठी 2999 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना रोज 3 जीबी डेटा देते. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस हे लाभ मिळतात.