iPhone 12 Pro Discount Offer : आयफोन प्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. तुम्ही तुमचा जुना आयफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल किंवा नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. Apple iPhone 12 Pro हा फोन मागील वर्षी 1,19,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च झाला होता, तो आता Amazon India वेबसाइटवर मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. (buy IPhone 12 Pro smartphone with discount via Amazon sale)
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon च्या वेबसाइटनुसार, iPhone 12 Pro चं 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 98,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 1,02,900 रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत भारतात 1,07,900 रुपये असेल. याशिवाय, ग्राहक बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करुन या फोनवर 1,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काऊंट मिळवू शकतात.
एक्सचेंज ऑफरनुसार, ग्राहकांना हँडसेटवर 14,900 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. Apple 20W USB-C पॉवर अॅडॉप्टर खरेदी करू इच्छिणाऱ्या खरेदीदारांना 1,899 रुपये अतिरिक्त मोजावे लागतील. Apple iPhone 12 Pro आता गोल्ड, ग्रॅफाइट, पॅसिफिक ब्लू आणि सिल्व्हर कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. Apple iPhone 12 Pro यापुढे Apple Store वर खरेदीसाठी उपलब्ध असणार नाही. इतर ई-कॉमर्स वेबसाइटवर, स्टॉक संपेपर्यंत या फोनची विक्री सुरू असेल.
iPhone 12 Pro मध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे आणि तो सिरॅमिक शील्ड कोटिंगसह येतो. iPhone 12 Pro A14 बायोनिक चिपवर चालतो. स्मार्टफोनमध्ये 12MP अल्ट्रा वाइड, टेलिफोटो लेसन्स, 4x ऑप्टिकल झूम रेंजसह प्रो कॅमेरा सिस्टीम, कॅमेरा नाईट मोड, डीप फ्यूजन, स्मार्ट HDR 3, Apple ProRAW, 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंग आणि अनेक फोटोग्राफी फीचर्स यामध्ये मिळतील. त्याच वेळी, iPhone 12 च्या फ्रंटला 12 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.
Apple चा iPhone 13 लाँच झाल्यानंतर युजर्सचे लक्ष iPhone 14 कडे लागले आहे. नव्या आयफोनच्या फीचर्सबाबतही चर्चा सुरू झाली आहे. एका नवीन अहवालानुसार, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max हे आतापर्यंतचे सर्वात मोठा कॅमेरा अपग्रेड पॅक ऑफर करू शकतात. इतकेच काय, आगामी आयफोनच्या अपग्रेडमध्ये सर्वाधिक रॅम देखील समाविष्ट होऊ शकतो. एक नवीन अहवाल सूचित करतो की Apple कंपनी 2022 च्या उत्तरार्धात मिनी मॉडेलशिवाय चार नवीन आयफोन मॉडेल लाँच करु शकते. अॅनालिस्ट जेफ पू (MacRumors) कडून हे दावे करण्यात आले आहेत.
Apple चार मॉडेल लॉन्च करू शकते, ज्यात 6.1 इंचाचा डिस्प्ले असलेला iPhone 14, 6.7-इंचाचा डिस्प्ले असलेला iPhone 14 Max, 6.7 इंचाचा डिस्प्ले असलेला iPhone 14 Pro आणि 6.7 इंचाचा डिस्प्ले असलेला iPhone 14 Pro Max यांचा समावेश आहे. हायटॉन्ग इंटरनॅशनल सिक्युरिटीज विश्लेषक पू यांच्या एका नोटमध्ये, Apple त्यांच्या प्रो मॉडेलवर कॅमेरे अपग्रेड करू शकते, ज्यामध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी वाइड-अँगल कॅमेरा समाविष्ट असल्याचे म्हटले आहे. असे म्हटले जात आहे की Apple त्यांच्या फोनच्या बॅक पॅनेलवर तीन कॅमेरे देईल. नवीन माहितीनुसार, केवळ प्रायमरी सेन्सर अपग्रेड केला जाईल. आयफोन 14 प्रो आणि प्रो मॅक्स मॉडेल 12 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आणि टेलीफोटो सेन्सर्ससह येतील. तर त्यांचा प्रायमरी सेन्सर 48 मेगापिक्सेलमध्ये अपग्रेड केला जाईल.
इतर बातम्या
iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन
Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
(buy IPhone 12 Pro smartphone with discount via Amazon sale)