उन्हाळा असो किंवा हिवाळा, प्रत्येक ऋतूमध्ये उपयोगी Air Conditioner, 13000 रुपयांच्या डिस्काऊंटसह

| Updated on: Jan 06, 2022 | 2:19 PM

हिवाळा सुरु झाला आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला जर एसी खरेदी करा असे सांगितले तर तुम्ही काय म्हणाल? हिवाळ्यात एसी कोण विकत घेतो असे तुम्हाला वाटेल. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की असे एसी देखील बाजारात आहेत जे हॉट अँड कोल्ड फीचरसह येतात.

उन्हाळा असो किंवा हिवाळा, प्रत्येक ऋतूमध्ये उपयोगी Air Conditioner, 13000 रुपयांच्या डिस्काऊंटसह
Samsung Convertible 5-in-1 Hot & Cold Inverter Split AC
Follow us on

मुंबई : हिवाळा सुरु झाला आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला जर एसी खरेदी करा असे सांगितले तर तुम्ही काय म्हणाल? हिवाळ्यात एसी कोण विकत घेतो असे तुम्हाला वाटेल. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की असे एसी देखील बाजारात आहेत जे हॉट अँड कोल्ड फीचरसह येतात. हे एसी उन्हाळ्यात थंड हवा आणि हिवाळ्यात उबदार हवा देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्प्लिट एसीबद्दल माहिती देणार आहोत. आम्ही Samsung Convertible 5-in-1 Hot & Cold Inverter Split AC बद्दल बोलत आहोत. चला तर मग या Split AC बद्दल जाणून घेऊया. (Buy Samsung Air Conditioner with hot and cold feature with 13000 rupees discount)

Samsung Convertible 5-in-1 Hot & Cold Inverter Split AC हा हॉट आणि कोल्ड इन्व्हर्टर एसी आहे. यात 2 वे स्विंग आहे. यासोबतच 100 टक्के कॉपर कंडेन्सरही देण्यात आला आहे. हे R32 Refrigerant फीचरसह येतो. यामध्ये 5 इन वन कनव्हर्टिबल मोड्स आहेत. यासोबतच 5 वर्षांची कॉम्प्रीहेंसिव्ह वॉरंटी देण्यात आली आहे. हा एसी 4 स्टार रेटिंगसह येतो. यात ऑटो क्लीनिंग फीचर देखील आहे. 5 इन वन कनव्हर्टिबल मोड्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा एसी एनर्जी कंजम्पशनला ऑप्टिमाइज करण्यासाठी कंप्रेसर ऑपरेशनला 40-120% पर्यंत अॅडजस्ट करतो.

Samsung Convertible 5-in-1 Hot & Cold Inverter Split AC ची किंमत

या स्प्लिट एसीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास हा एअर कंडीशनर खरेदी करण्यासाठी तुम्हाला 54,990 रुपये मोजावे लागतील. मात्र हा एसी 13,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह खरेदी करता येईल. त्यामुळे तुम्ही हा एसी 41,990 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. तसेच हा एसी तुम्ही नो कॉस्ट ईएमआयवरदेखील खरेदी करु शकता. यासाठी 3480.39 रुपये प्रति महिना इतका ईएमआय भरावा लागेल. तसेच हा एसी तुम्ही स्टँडर्ड EMI वर देखील खरेदी करु शकता. यासाठी किमान ईएमआय 1976.61 रुपये प्रति महिना भरावे लागतील. जर तुम्हाला हा एसी विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. कारण हा एसी Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स वेबसाईटवर उपलब्ध नाही.

इतर बातम्या

नवीन वर्षात व्हाट्सअपचे नवीन फिचर ! नोटिफिकेशनमध्ये दिसणार चेहरा, नोटिफिकेशनमध्ये युजरचा चेहरा स्क्रीनवर झळकणार

Vivo V23 : कलर चेंजिंग इफेक्ट असलेला भारतातला पहिला स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत…

Nokia Mobile : नोकियानं लॉन्च केले परवडणारे स्मार्टफोन्स, किंमत आणि फिचर्स एका क्लिकवर…

(Buy Samsung Air Conditioner with hot and cold feature with 13000 rupees discount)