Marathi News Technology Central Govt changed Mobile Prepaid Sim Card Rules, Airtel, Jio, Voda Idea new sim card Niyam
केंद्र सरकारडून मोबाईल सिमकार्डशी संबंधित नियमांत बदल, जाणून घ्या सर्वकाही
आता नवीन सिम कनेक्शन मिळवण्यासाठी किंवा प्रीपेड नंबर पोस्टपेड किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये रुपांतरित करण्यासाठी फिजिकल फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही.
1 / 6
आता नवीन सिम कनेक्शन मिळवण्यासाठी किंवा प्रीपेड नंबर पोस्टपेड किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये रुपांतरित करण्यासाठी फिजिकल फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही. दूरसंचार कंपन्या डिजिटल माध्यमातून हा फॉर्म भरू शकतील. सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता दिली आहे.
2 / 6
आतापासून जर तुम्हाला नवीन मोबाईल नंबर किंवा टेलिफोन कनेक्शन घ्यायचे असेल तर तुमचे केवायसी पूर्णपणे डिजिटल होईल. म्हणजेच केवायसीसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची कागदपत्र सादर करावी लागणार नाहीत. पोस्टपेड सिमला प्रीपेड करण्यासारख्या सर्व कामासाठी कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही. यासाठी डिजिटल केवायसी वैध असेल.
3 / 6
नवीन नियमांनुसार, तुम्ही सिम प्रदात्याच्या अॅपद्वारे सेल्फ केवायसी करू शकाल. यासाठी तुम्हाला फक्त 1 रुपया भरावा लागेल.
4 / 6
सध्याच्या नियमांनुसार, जर एखाद्या ग्राहकाने आपला प्रीपेड नंबर पोस्टपेड किंवा पोस्टपेडमधून प्रीपेडमध्ये बदलला, तर त्याला प्रत्येक वेळी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पण आता केवायसी फक्त एकदाच करावे लागेल.
5 / 6
केवायसीसाठी ग्राहकांकडून काही कागदपत्रे मागितली जातात. हे काम तुम्ही ज्या ठिकाणी सिम घेत आहात त्या ठिकाणी जाऊन करावे लागते, परंतु जर तुम्ही स्वतः ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कागदपत्रे अपलोड करून तुमचे केवायसी करत आहात तर त्याला सेल्फ केवायसी म्हणतात. हे वेबसाइट किंवा अॅप्लिकेशनद्वारे केले जाऊ शकते.
6 / 6
यासाठी सर्वप्रथम सिम प्रदात्याचे अॅप्लिकेशन फोनमध्ये डाऊनलोड करावे लागेल. यानंतर, आपल्याला आपल्या फोनवर नोंदणी करावी लागेल आणि पर्यायी क्रमांक द्यावा लागेल, जो आपल्या ओळखीच्या व्यक्तीचाही असू शकतो. यानंतर तुम्हाला वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल. यानंतर तुम्हाला लॉग इन करून सेल्फ केवायसीचा पर्याय निवडावा लागेल, ज्यामध्ये तुम्ही विनंती केलेली माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करू शकता.